Bicholim News : म्हादई अभयारण्यात ‘व्याघ्र प्रकल्प’ हवाच

पर्यावरणप्रेमी : डिचोलीतील विविध ग्रामपंचायतींनी केली जागृती
Ramesh Gawas and Amrit Singh
Ramesh Gawas and Amrit SinghGomantak digital Team
Published on: 
Updated on: 

डिचोली : पर्यावरणाचा समतोल सांभाळतानाच ''म्हादई''चे अस्तित्व राखायचे असेल, तर म्हादई अभयारण्य ''व्याघ्रप्रकल्प'' (क्षेत्र) म्हणून अधिसूचित होणे काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक रमेश गावस आणि प्राणी मित्र संघटनेचे अमृत सिंग यांनी व्यक्त केले आहे. म्हादई अभयारण्य ''व्याघ्रप्रकल्प'' (क्षेत्र) होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. मये पंचायतीत ते पत्रकारांशी बोलत होते.

''म्हादई आणि वाघ वाचवा'' या मिशन अंतर्गत रमेश गावस आणि अमृतसिंग यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणप्रेमीच्या एका गटाने आज (सोमवारी) डिचोलीतील विविध पंचायतींना भेट दिली. पर्यावरणप्रेमींनी विविध ठिकाणी सरपंच, पंचसदस्यांसह नागरिकांची भेट घेऊन त्यांना वाघाचे पर्यावरणाशी नाते आणि महत्व विशद करून व्याघ्र क्षेत्रासंबंधी जागृती केली. यावेळी आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे आणि अन्य पर्यावरणप्रेमी हजर होते. मये पंचायतीतून या मिशनला सुरवात झाली.

Ramesh Gawas and Amrit Singh
Bicholim News : डिचोलीत वेदांताच्या खाणीवर बाहेरील कामगारांना रोखले

वायू पुरवणारी झाडे, ही प्रत्येक प्राणीमात्रांचे मित्र आहेत. ज्या जंगलात वाघाचे अस्तित्व आहे, ते जंगल श्रीमंत आणि समृद्ध आहे. वाघामुळेच जंगल सुरक्षित राहतात. म्हादई अभयारण्यात वाघाचे अस्तित्व असूनदेखील राजकर्त्यांना हे अभयारण्य व्याघ्र क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन झालेले नको आहे.

Ramesh Gawas and Amrit Singh
Bicholim News : मुलांचे भवितव्य पालकांवर अवलंबून - प्रेमेंद्र शेट

अशी खंत रमेश गावस यांनी व्यक्त केली. वाघाचे पर्यावरणाशी असलेले नाते याबद्दल त्यांनी उदाहरणासह माहिती दिली. अमृत सिंग यांनीही वाघाचे निसर्गाशी असलेले नाते आणि व्याघ्र प्रकल्पाचे महत्व सांगितले.

Ramesh Gawas and Amrit Singh
Bicholim News: वीज खात्याकडे काँग्रेसची मागणी; भूमिगत वीज केबलसाठी खोदकाम...

समर्थनार्थ ठराव घ्यावा :

खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी खाणमालक पंचायतींना हाताशी धरून समर्थनार्थ ठराव घेतात. तर मग व्याघ्र क्षेत्र अधिसूचित व्हावे. यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवावे, असे आवाहन रमेश गावस यांनी केले. राजन घाटे यांनीही म्हादई आणि वाघाचे महत्त्व विशद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Konkani Essay Book Launch
Mhadei Water Dispute
Goa Water Resources Department Officers
Goa Karnataka Water Diversion
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com