Bicholim News: वीज खात्याकडे काँग्रेसची मागणी; भूमिगत वीज केबलसाठी खोदकाम...

डिचोलीतील खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरूस्त करा!- कार्यकर्त्यांकडून निवेदन सादर
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak

Bicholim News: भूमिगत वीज केबल घालण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात डिचोली शहरात मोठी समस्या निर्माण होणार आहे. या खोदकामांमुळे अपघातांचीही शक्यता आहे. अशी भीती डिचोली गट काँग्रेसने व्यक्त केली आहे.

खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करावेत. अशी मागणीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वीज खात्याच्या डिचोली कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे केली.

महेश म्हांबरे आणि मनोज नाईक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी डिचोलीतील वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये श्रीरंग परब, मुस्तफा बेग, फिरोज बेग, नासीर शेख, अब्दुल रहीम आदींचा समावेश होता.

Bicholim News
Ponda News : ...फोंड्यात खोदकाम सुरुच!

पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याच्या बाजूने खोदलेले चर काही ठिकाणी उघड्या अवस्थेत आहेत. खोदलेले हे चर तसेच राहिल्यास पावसाळ्यात हे चर पाण्याने भरून वाहतुकीस अडचण ठरणार आहे.

हे उघडे चर अपघातांनाही निमंत्रण ठरणार आहेत, असे महेश म्हांबरे, मनोज नाईक आणि अन्य कार्यकर्त्यांनी वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले. वीज खात्यातर्फे करण्यात येणाऱ्या मान्सूनपूर्व कामाबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.

काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचेही या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी लक्ष घालून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

Bicholim News
Goa Crime: आधी राहिले एकत्र; वाद झाल्याने केला खून

ताळमेळ नाही!

खोदकामाबद्दल वीज खात्याला विचारले, तर ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवतात. नगरपालिकाही कानावर हात ठेवते, असे महेश म्हांबरे आणि मनोज नाईक यांनी सांगून, वीज, सार्वजनिक खाते आणि पालिकेमध्ये ताळमेळ नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप महेश म्हांबरे आणि मनोज नाईक यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com