Bicholim : अनुकूल हवामानामुळे काजू उत्पादनात वाढ

डिचोलीत 35 टक्के अधिक फेणी : बियांना अद्याप 80 रुपये किलो दर, खरेदी सुरूच
Cashew
CashewGomantak Digital Team
Published on
Updated on

अनुकूल हवामानामुळे यंदा काजू पीक समाधानकारक होते. त्यामुळे यंदा फेणी उत्पादनासह काजूबियांच्या उत्पादनातही वाढ झाल्याने काजू बागायतदारांसह या पिकावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर काहीसे समाधानाचे हास्य उमटल्याचे दिसून येत आहे.

गेल्या सात-आठ वर्षांच्या तुलनेत यंदा काजू हंगामातील जवळपास पूर्ण तीन महिने कोणत्याही अडचणीशिवाय काजू व्यवसाय चालला. त्यामुळे काजूबियांसह फेणी उत्पादनातही वाढ झाली आहे. दरम्यान, काजू हंगाम संपला असला, तरी डिचोलीत अजूनही काजूबिया खरेदी करण्यात येत आहेत.

Cashew
Bicholim : व्हाळशी-बोर्डे रस्‍ता बळींसाठी भुकेलेला! आतापर्यंत अपघातांत 25 जणांचा मृत्‍यू

काजूपिक हा डिचोलीतील एक प्रमुख व्यवसाय. तालुक्यातील सर्वण, मये, कारापूर, पिळगाव, नार्वे, धुमासे, कुडचिरे, उसप, लाडफे आदी भागात काजूच्या मोठ्या बागायती आहेत. यंदा काजूपिकाचा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने काजूबियांचे उत्पादनही वाढले. गेल्या सात-आठ वर्षांच्या तुलनेत यंदा काजूबियांचे प्रमाण जवळपास २५टक्के वाढले. फेणी उत्पादनातही ३५ टक्के वाढ झाल्याची माहिती उत्पादकांकडून मिळाली आहे.

काजूबियांची खरेदी

डिचोलीत एक-दोन ठिकाणी अजूनही काजूबियांची खरेदी चालू आहे. मंगळवारी ८० रुपये प्रति किलो या दराने काजूबिया खरेदी करण्यात येत होत्या. पाऊस सक्रिय होईपर्यंत काजूबिया खरेदी करण्यात येणार असल्याचे संकेत बाजारातील एका व्यापाऱ्याकडून मिळाले आहेत. यंदा काजूबियांचे उत्पादन वाढले असले, तरी बागायतदारांना अपेक्षेप्रमाणे दर मिळाला नाही. जास्तीत जास्त १२५ रु. प्रति किलो असा बागायतदारांना काजूबियांचा भाव मिळाला आहे.

Cashew
Bicholim News : लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला लवकरच चालना - गुदिन्हो

वरुणराजाची कृपादृष्टी

सलग दोन वर्षे काजू व्यवसायाला ''कोविड'' महामारीचा फटका बसल्यानंतर गेल्यावर्षी हंगामाच्या सरतेशेवटी अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे गेली सलग तीन वर्षे काजूबिया आणि फेणी उत्पादनात कमालीची घट झाली होती. त्यापूर्वीही चार-पाच वर्षे असंतुलित हवामानाचा काजू व्यवसायावर परिणाम झाला होता. यंदा मात्र काजू पिकाला हवामान पोषक होते. वरुणराजानेही कृपा केल्याने अवकाळी पावसाचा तडाखा बसला नाही. मध्यंतरी एप्रिल महिन्यातील काही दिवस सोडल्यास पूर्ण हंगामात काजूला समाधानकारक बहर होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com