Heavy Rain Bicholim: डिचोली बाजार संकुलाचे छप्पर उडाले; आत शिरले पाणी, व्यापाऱ्यांचे नुकसान; पालिकेविरोधात संताप

Bicholim Market Complex: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल सायंकाळी डिचोलीत कहर केला.
Heavy Rain Bicholim
Heavy Rain BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल सायंकाळी डिचोलीत कहर केला. वादळी वाऱ्याच्या तडाख्यात डिचोली बाजार संकुलाच्या छपरावरील दोन पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी थेट संकुलात शिरले आणि काही वेळातच संपूर्ण बाजार संकुल जलमय झाले. यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.

संकुलात पाणी शिरताच आपले साहित्‍य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. त्यानंतर झाडूच्या साहाय्याने साचलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वादळी वाऱ्यामुळे छपरावरील अन्य पत्रेही सैल झाल्याने पुन्हा अशाच प्रकारचा धोका निर्माण होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Heavy Rain Bicholim
Goa Crime: प्रेमासाठी बिहारहून थेट गोव्यात! प्रेयसीला पटवण्यात अपयश, संतापातून दाम्पत्यावर जीवघेणा चाकूहल्ला; आरोपी वेर्णा पोलिसांच्या जाळ्यात

व्यापाऱ्यांच्या मते, बाजार संकुलाचे छप्पर अनेक वर्षांपासून जीर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीची मागणी करणारे निवेदन गेल्या महिन्यात पालिकेला देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही स्थिती उद्‌भवल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

गेल्या वर्षीही तीनवेळा छपरावरील पत्रे उडाल्याची आठवण करून देत, पालिकेने केवळ कर वसुलीवर भर न देता व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने छप्पर दुरुस्त करावे, अशी मागणी होत आहे.

Heavy Rain Bicholim
Goa politics: काँग्रेसचा 'पिग्मॅलिअन' कोण?

व्यापाऱ्यांच्या प्रमुख तक्रारी काय आहेत?

छप्पर अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत, दुरुस्तीची मागणी करूनही पालिकेले दुर्लक्ष, पावसामुळे फळभाजी व अन्य मालाचे नुकसान, सैल झालेले पत्रे पुन्हा उडण्याची भीती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com