Bicholim Market: डिचोली परिसरात वटवृक्षाला फेरे घालण्यासाठी सुवासिनी सज्ज! खरेदीसाठी गर्दी; बाजारात फळांसह फुलेही महागली

Vat Purnima Shopping: प्रतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजेच वटपौर्णिमा.
Bicholim Vat Purnima Shopping
Bicholim Vat Purnima ShoppingDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: प्रतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधाण देणारे व्रत म्हणजेच वटपौर्णिमा. आज वटपौर्णिमा साजरी होत असल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या व्रताच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे. वटवृक्षाभोवती सात फेरे घालण्यासाठी सुवासिनीही सज्ज आहेत.

वटपौर्णिमेला लागणारे साहित्यही बाजारात दाखल झाले असून, या साहित्याने बाजार फुलून गेला आहे. बाजारात वटपौर्णिमेच्या साहित्याची खरेदी सुरु झाली असून, सकाळपासून खरेदीला जोर आला. काल सायंकाळी बाजार गर्दीने फुलून गेला होता.

Bicholim Vat Purnima Shopping
Goa Heavy Rain: डिचोलीत पावसाचा धुमाकूळ! दोन ठिकाणी झाडे कोसळली, घरावरील कौले फुटून नुकसान

बाजारात यंदा अननसांची आवक कमी असून, अननसांसह अन्य सामानही काहीसे महाग झाले आहे. तरीदेखील महिला हे सामान उत्साहाने खरेदी करताना दिसून येत आहेत. दरम्यान, आज दुपारी दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने साहित्य खरेदीवर काहीसा परिणाम झाला.

Bicholim Vat Purnima Shopping
Goa Sindhudurg Sand Transport: गोवा-सिंधुदुर्ग रेती वाहतूक 8 दिवसांत सुरळीत! नीलेश राणेंचा विश्‍‍वास

वटपौर्णिमेला काही क्षण असल्याने आज डिचोलीचा बाजार वटपौर्णिमेच्या साहित्याने फुलून गेला होता. अननस, आंबे, फणस, केळी आदी फळांसह वडाच्या फांद्या, वडाची पाने, अणशीचे दोर आदी साहित्य डिचोली बाजारात दाखल झाले होते. आज रसाळ फणस १५० ते २०० रुपये नग तर कापा फणस आकाराप्रमाणे ३०० ते ४०० रुपये नग या दराने विकण्यात येत होते.

एकाबाजूने फळे महाग झाली असतानाच यंदा फुलांचाही भाव वाढला असून ८०० ते एक हजार रुपये किलो असे फुलांचे दर आहेत. फूले महाग असली, तरी वटपौर्णिमेसाठी फुलांची आवश्यकता असल्यामुळे त्यांना मागणी आहे.

- राजेंद्र मयेकर, फूलविक्रेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com