Goa Monsoon Farming: डिचोलीत भाजी लागवडीची लगबग, पण मान्सून रुसल्याने बळीराजा चिंतेत; लागवडीची कामे खोळंबली

Porsu Vegetable Cultivation: डिचोलीतील नार्वेसह विविध ग्रामीण भागांत सध्या ‘पोरसू’ अर्थातच पावसाळी भाज्यांची लागवड करण्याची लगबग सुरू झाली.
Goa Monsoon Farming
Porsu Vegetable CultivationDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: डिचोलीतील नार्वेसह विविध ग्रामीण भागांत सध्या ‘पोरसू’ अर्थातच पावसाळी भाज्यांची लागवड करण्याची लगबग सुरू झाली असतानाच अजूनही मान्सून सक्रिय झाला नसल्याने भाजी लागवडीची कामे खोळंबून पडली आहेत. शेतकऱ्यांनी भाजी लागवडीसाठी ‘मळे’ही तयार केले आहेत. आता कधी एकदाचा पाऊस सक्रिय होतोय आणि भाज्यांची बियाणी रोवायला मिळतात, त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दरवर्षी जून महिना लागताच शेतकरी भाजी लागवडीची कामे हातात घेत होते. पावसाअभावी यंदा काहीसा उशीर झाला आहे. डिचोलीतील नार्वेसह साळ, मेणकुरे, मये, कुडचिरे, पिळगाव, बागवाडा, लाडफे, आदी बहुतेक गावोगावी शेतकरी दरवर्षी पावसाळी गावठी भाज्यांची लागवड करतात. भाजी लागवडीच्या बाबतीत नार्वे गाव आघाडीवर आहे.

Goa Monsoon Farming
Plant Care Tips: नर्सरीसारखी सुबक बाग हवीये? पावसाळ्यात कुंडीतील झाडांची 'अशी' घ्या काळजी

नार्वेतील शेतकरी दरवर्षी पावसाळ्यात ‘दिवगाळी’ या भागात भाजीचे मळे फुलवतात. डिचोलीतील अन्य भागांच्या तुलनेत नार्वेत पावसाळी भाजी अगोदर पिकते. नार्वे भागात पिकणारी काकडी, दोडकी, भेंडी आदी पावसाळी भाजी सर्वात अगोदर बाजारात विक्रीस उपलब्ध होत असते.

सध्या पावसाळी वातावरण असले, तरी भाजी लागवडीसाठी अजूनतरी अनुकूल पाऊस पडलेला नाही. त्यामुळे भाजी लागवड खोळंबून पडली आहे. काही शेतकऱ्यांनी भेंडी, काकडी आदी बियाणी रोवलेली आहेत. मात्र, मुबलक पाऊस नसल्याने अजूनतरी बियाणी रुजून वर आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

Goa Monsoon Farming
Plant Care Tips: रोपं जगवण्याचा 'गोल्डन फॉर्म्युला', इनडोअर प्लांट्स मरण्यापासून वाचवण्यासाठी 'हे' उपाय करा

गावठी बियाण्याला पसंती

सध्या कृषी खात्यासह बाजारात संकरित जातीची भाजीची बियाणीही विक्रीस उपलब्ध झाली आहेत. तरी भाज्यांच्या गावठी बियाण्यांचा वापर करण्याकडे बहुतेक शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळी भाज्यांची लागवड करीत आहोत.

‘मळ्यात’ पिकणारी ताजी भाजी खायला मिळत तर आहेच. शिवाय बाजारात विकून मिळणाऱ्या आर्थिक कमाईतून घरसंसार चालविण्यास काहीसा हातभार लागतो. संकरित बियाण्यांऐवजी आम्ही स्वतःकडील गावठी बियाण्यांचा वापर करीत आहोत, असे नार्वे येथील शेतकरी सदानंद चोडणकर आणि गणेश माशेलकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com