Plant Care Tips: नर्सरीसारखी सुबक बाग हवीये? पावसाळ्यात कुंडीतील झाडांची 'अशी' घ्या काळजी

Sameer Amunekar

पाण्याचा निचरा

कुंडीच्या तळाशी असलेले छिद्र (Hole) मोकळे आहे का ते तपासा. त्यात माती किंवा दगड अडकल्यास पाणी साचून झाडांची मुळे सडू शकतात.

Plant Care Tips | Dainik Gomantak

झाडांना ओव्हर-वॉटरिंगपासून वाचवा

सतत पाऊस पडत असेल, तर कुंडीतील माती सुकेपर्यंत झाडांना वेगळे पाणी घालू नका. माती जास्त चिखल झाली असेल, तर काही दिवस झाड शेडखाली किंवा गॅलरीत सरकवा.

Plant Care Tips | Dainik Gomantak

'इनडोअर' झाडांना बाहेर काढा

मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा इतर इनडोअर झाडांना पावसाचे पाणी खूप आवडते. आठवड्यातून एकदा तरी त्यांना काही तासांसाठी पावसात ठेवा, जेणेकरून पानांवरील धूळ निघून जाईल आणि झाड ताजेतवाने होईल.

Plant Care Tips | Dainik Gomantak

योग्य खतांचा वापर करा

पावसाळ्यात झाडांची वाढ वेगाने होते. या काळात शेणखत किंवा गांडूळ खत (Vermi-compost) द्या. मात्र, खत दिल्यानंतर लगेच मुसळधार पाऊस येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर खत वाहून जाईल.

Plant Care Tips | Dainik Gomantak

कीटक आणि बुरशीपासून संरक्षण

पावसाळ्यात झाडांवर बुरशी (Fungus) किंवा किडे लागण्याचा धोका जास्त असतो. यासाठी दर १५ दिवसांनी झाडांवर कडुलिंबाचे तेल (Neem Oil) किंवा हळदीचे पाणी फवारा.

Plant Care Tips | Dainik Gomantak

छाटणी करा

झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि पिवळी पडलेली पाने वेळीच कापून टाका. पावसाळ्यात छाटणी केल्यामुळे झाडाला नवीन पालवी फुटते आणि झाड अधिक सुबक व दाट दिसते.

Plant Care Tips | Dainik Gomantak

कुंड्यांची जागा बदला

कॅक्टस किंवा सक्युलंट्स (Succulents) सारख्या ज्या झाडांना कमी पाणी लागते, त्यांना पावसाच्या थेट पाण्यापासून दूर ठेवा. तसेच, कुंडीखालील प्लेट्स काढून टाका जेणेकरून त्यात पाणी साचून डास होणार नाहीत.

Plant Care Tips | Dainik Gomantak

रात्रीच्या 'या' स्किनकेअर रुटीनची जादू पहा!

Night Skincare Routine | Dainik Gomantak
येथे क्लिक करा