Bicholim Water Crisis: मुसळधार पावसात नळ मात्र कोरडेच! चतुर्थी’च्या तोंडावर डिचोलीत पाणीसंकट; पडोसे प्रकल्पात तांत्रिक बिघाड

Goa Water Crisis: सर्वत्र चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू असतानाच, दिवसभर पाण्याची समस्या निर्माण झाल्याने विविध भागातील लोकांवर विशेष करून गृहिणींची गैरसोय झाली.
Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Goa Water ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: भर ‘चतुर्थी’च्या तोंडावर नळ कोरडे पडल्याने डिचोलीतील विविध भागात (शुक्रवारी) दिवसभर पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली. सर्वत्र चतुर्थीच्या तयारीची लगबग सुरू असतानाच, दिवसभर पाण्याची समस्या निर्माण झाल्याने विविध भागातील लोकांवर विशेष करून गृहिणींची गैरसोय झाली.

उपलब्ध माहितीनुसार, पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागात मात्र पाण्याची समस्या निर्माण झाली. दिवसभर घरगुती नळ कोरडे राहिल्याने गृहिणींवर पाण्यासाठी अश्रू गाळण्याची वेळ आली. साफसफाई आदी चतुर्थीच्या तयारीची कामे खोळंबून पडली.

Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Goa Water Supply: गोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे 7 जलप्रकल्प राहणार उभे; 913 एमएलडी पाणी मिळणार

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होणार, अशी माहिती पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातील सूत्रांनी दिली होती. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत नळ कोरडेच राहिले होते. रात्री उशिरापर्यंत बिघाड दूर करण्यात यश आले नव्हते. त्यामुळे नळ कोरडेच होते. मुळगाव, मये आदी काही भागात तर कालपासून नळ कोरडे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Sattari Water Crisis, Goa Water Crisis
Water Bill Dispute: पाणी बिल आले 83000, भरले 1500! कामुर्लीतील महिलेने दिला लढा; पाणी विभागाकडून चुकीची दुरुस्ती

नळांना पाणी नसल्याने डिचोली शहरातील बोर्डे आदी काही भागात तसेच तालुक्यातील कारापूर, सर्वण, वन, मुळगाव, मये आदी बहुतेक भागातील लोकांची धांदल उडाली. ऐन चतुर्थीच्या तोंडावर नळ कोरडे राहिल्याने आमचे अक्षरशः हाल झाले आहेत, अशी व्यथा बोर्डे येथील मीनाक्षी सातार्डेकर यांच्यासह अन्य गृहिणींनी मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com