Water Bill Dispute: पाणी बिल आले 83000, भरले 1500! कामुर्लीतील महिलेने दिला लढा; पाणी विभागाकडून चुकीची दुरुस्ती

Camurlim woman water bill: मारिया डिसोझा यांना २०२३ साली ८३ हजार रुपयांचे पाणी बिल देण्यात आले होते. गेली दोन वर्षे मारिया पाणी विभागात फेऱ्या मारत होत्या.
 Water bill error correction Goa
PWD Goa water bill issueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: कामुर्ली येथील एका महिलेला दोन वर्षांपूर्वी ८३ हजार रुपये पाण्याचे बिल आले होते. त्यानंतर तिने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाकडे दोन वर्षे हे बिल कमी करण्यासाठी लढा चालविला. आता दोन वर्षांनंतर तिचे बिल ८३ हजारांवरून केवळ १५०० रुपये करून चुकीची दुरुस्ती करण्यात आली आहे.

मारिया डिसोझा यांना २०२३ साली ८३ हजार रुपयांचे पाणी बिल देण्यात आले होते. गेली दोन वर्षे मारिया पाणी विभागात फेऱ्या मारत होत्या. सोमवारी त्यांचे पाणी बिल १५०० रुपये व ५०० रुपये मीटर भाडे असे दोन हजार रुपये भरण्यास सांगितले गेले. मारिया डिसोझा यांची बाजू समाजकायकर्ते फिडोल परेरा यांनी मांडली.

या बिलाचे शुल्क पुष्कळ वेळा दुरुस्त करण्यात आले. पहिल्यांदा ८३ हजारांवरून ५३ हजार करण्यात आले. नंतर ४२ हजार रुपये व नंतर ४००० रुपये करण्यात आले होते. अखेरीस १५०० व ५०० रुपये असा समझोता झाला आणि मारिया डिसोझा यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.

 Water bill error correction Goa
Camurlim Crime: मैत्रिणीला भेटायला आलेल्या मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण; कामुर्ली परिसरात खळबळ

दरम्यान, अशाप्रकारच्या घटनांमुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बिले देताना अभ्यास करा! जर हे बिल अशिक्षित व्यक्तीला दिले असते तर त्याने ते मुकाट्याने भरले असते; पण मारिया यांनी शेवटपर्यंत लढाई सोडली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बिले देताना प्रथम अभ्यास करावा व लोकांच्या चुकीच्या बिलांची तत्काळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी परेरा यांनी केली आहे.

 Water bill error correction Goa
Goa Water Crisis: गोवावासीयांसमोर भीषण पाणीसंकट! राज्यात 62 MLD पाण्याची तूट; तक्रारींचा वाढला ओघ

बिले देताना अभ्यास करा!

जर हे बिल अशिक्षित व्यक्तीला दिले असते तर त्याने ते मुकाट्याने भरले असते; पण मारिया यांनी शेवटपर्यंत लढाई सोडली नाही.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बिले देताना प्रथम अभ्यास करावा व लोकांच्या चुकीच्या बिलांची तत्काळ दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी परेरा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Rainfall Deficit 2026
 Shappora River water Goa
Mhadei Water Dispute
379 Rupees Food Order Viral Post
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com