Bicholim News : डिचोलीत औद्योगिक प्रगती शक्य : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये

Bicholim News : लाटंबार्से ‘आयडीसी’त ट्रान्स्फॉर्मरचे उद्‍घाटन
MLA Dr. chandrakant shetye
MLA Dr. chandrakant shetyeDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News : डिचोली मतदारसंघात येणाऱ्या नियोजित लाटंबार्से औद्योगिक वसाहतीला चालना देण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य मिळत आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगून एकदा काय आयडीसी कार्यान्वित झाली, की मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रगती होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

औद्योगिक वसाहतीत वीज ट्रान्स्फॉर्मर आणि पथदीपांचे उद्‍घाटन केल्यानंतर आमदार डॉ. शेट्ये बोलत होते.

यावेळी आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक परिमल, लाटंबार्सेचे सरपंच पद्माकर मळीक, मेणकुरेचे सरपंच गुरुदास परब, डॉ. रामा गावकर, पूजा घाडी आदी पंच सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

MLA Dr. chandrakant shetye
Goa Accident Case: धक्कादायक! ...आठवड्यात 50 अपघातांची नोंद; 8 बळी

वीज पुरवठ्यासाठी ४० कोटी

लाटंबार्सेतील नियोजित ‘आयडीसी’त वीज उपकेंद्र आणि अंतर्गत वीजपुरवठ्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तूर्तास एक कोटी खर्चून परिसरात पथदीप कार्यान्वित करण्यात आले आहेत. ११ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी घालण्यात आली असून त्यातून १४ उद्योग प्रकल्पांना वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे आमदार डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

नियोजित आयडीसीत आत्तापर्यंत चार उद्योग प्रकल्पांनी नोंदणी केली आहे. वीजपुरवठा व्यवस्थित झाला, की या औद्योगिक वसाहतीला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. - डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com