

डिचोली: गेली जवळपास चार वर्षे रखडलेल्या येथील अत्याधुनिक बसस्थानक प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पावसातही काम युद्धपातळीवर सुरू असून चालू महिन्यातच त्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनाची डिचोलीवासीयांसह प्रवाशांनाही उत्सुकता लागली आहे.
या बसस्थानकाचे लोकार्पण मे महिन्यात करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र अंतिम टप्प्यातील काही कामे शिल्लक राहिल्याने उद्घाटन पुढे ढकलावे लागले. तरीही सध्या कामाचा वेग वाढविण्यात आला असून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये वेळोवेळी पाहणी करून प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे सुमारे १७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. एप्रिल २०२२ मध्ये कामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला पावसाळ्यात जमिनीतून पाणी झिरपणे तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे कामाचा वेग मंदावला आणि प्रकल्प रखडला.
या असतील प्रमुख सुविधा
तळमजल्यावर व्यापारी गाळे.
पहिल्या मजल्यावर आरटीओ कार्यालय.
दुसऱ्या मजल्यावर चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष व सभागृह.
प्रवाशांसाठी आराम कक्ष, वाचनालय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.