Broiler Chicken Rates Hike: गोव्यात मासळीनंतर ब्रॉयलर चिकनही महाग, खवय्यांच्या खिशाला मोठी कात्री; किलोमागे दरात 30 ते 40 रुपयांची वाढ

Bicholim Broiler Chicken Price Hike: ब्रॉयलर चिकन महाग झाल्याने डिचोलीतील खवय्यांच्या खिशाला कात्री बसत असून, जिभेलाही लगाम घालावा लागत आहे.
Bicholim Broiler Chicken Price Hike
Broiler Chicken Rates HikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: श्रावण महिना आणि चतुर्थी झाल्यानंतर आता ‘ब्रॉयलर चिकन’ पुन्हा एकदा महाग झाले आहे. एका बाजूने मासळीचा तुटवडा निर्माण होऊन तिचे दर वाढले असतानाच, आता ब्रॉयलर चिकनचे दरही ‘गरम’ झाले आहेत. ब्रॉयलर चिकन महाग झाल्याने डिचोलीतील खवय्यांच्या खिशाला कात्री बसत असून, जिभेलाही लगाम घालावा लागत आहे.

दुसऱ्या बाजूने, चिकन महाग झाले असले तरी हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून ब्रॉयलर चिकनला मागणी असल्यामुळे डिचोलीत चिकनच्या विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. चिकन विक्रेत्यांकडूनही तसे संकेत मिळाले आहेत. गेल्यावर्षी ख्रिसमसनंतर ब्रॉयलर चिकन महाग झाले होते. त्यानंतर श्रावण महिन्यात चिकनचे दर किलोमागे ३० ते ४० रुपयांनी घसरले होते. मात्र, आता ब्रॉयलर चिकन पुन्हा महाग झाले आहे.

Bicholim Broiler Chicken Price Hike
Chicken Shop Health Card: राज्यातील चिकन दुकानांतील कर्मचाऱ्यांना 'आरोग्य कार्ड', मडगावातून सोमवारपासून मोहिमेस प्रारंभ

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून डिचोलीत बॉयलर कोंबड्यांची आवक होत असते. एका बाजूने कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे, तर दुसऱ्या बाजूने इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यामुळे बॉयलर कोंबड्यांचे दर वाढत आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत आता ब्रॉयलर कोंबड्यांच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे.

Bicholim Broiler Chicken Price Hike
Chicken Price Hike: भर उन्हाळ्यात ब्रॉयलर चिकनचे दर 'भडकले', किलोमागे 30 रुपयांनी वाढ; तरीही मागणी

१६० ते १७० रुपये किलो

श्रावण महिन्यानंतर ब्रॉयलर कोंबडीचे दर १६० ते १७० रुपये किलो असे होते. मात्र, आता हाच दर २०० ते २१० रुपयांवर पोहोचला आहे. नॅट (सुटे) ब्रॉयलर चिकनचे दर तर ३०० ते ३२० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्यावर्षी नववर्षाच्या तोंडावर ‘ब्रॉयलर चिकन’च्या दरात अशीच वाढ झाली होती. आता ब्रॉयलर चिकन (Chicken) पुन्हा महाग झाले आहे. तरीदेखील चिकनच्या विक्रीवर तेवढासा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मात्र, सामान्य खवय्यांसाठी हे चिकन ‘गरम’ झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com