Chicken Shop Health Card: राज्यातील चिकन दुकानांतील कर्मचाऱ्यांना 'आरोग्य कार्ड', मडगावातून सोमवारपासून मोहिमेस प्रारंभ

Poultry Workers Health Card: गोव्यातील सर्व चिकन दुकाने आणि पोल्ट्री व्यवसायातील कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड देण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती
Poultry Workers Health Card
Chicken Shop Health CardDainik gomantak
Published on
Updated on

सासष्टी : गोव्यातील सर्व चिकन दुकाने आणि पोल्ट्री व्यवसायातील कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड देण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अखिल गोवा पोल्ट्री दुकानदार असोसिएशनने मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यभर ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना आरोग्य कार्ड प्रदान करण्यात येणार आहे.

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या मोहिमेची सुरवात सोमवार, १५ जून रोजी मडगाव येथे आयोजित विशेष शिबिरातून होणार आहे. त्यानंतर नावेली, वास्को, फोंडा आणि कळंगुट येथेही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात येतील. पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित; परंतु असोसिएशनचे सदस्य नसलेल्या व्यावसायिकांनीही या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Poultry Workers Health Card
Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारी पडायचं नसेल, तर 'या' 7 खाद्यपदार्थांपासून राहा दूर!

पोल्ट्री कचरा व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली. तालुकानिहाय पोल्ट्री कचरा संकलित करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याचे सांगण्यात आले. ही सेवा केवळ असोसिएशनच्या सदस्यांसाठी नसून इतर पोल्ट्री दुकानदारांचाही कचरा नियमितपणे उचलला जात असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता गरजेची!

चिकन दुकाने आणि पोल्ट्री व्यवसायातील आरोग्यविषयक मानके अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले. चिकन कापणे, त्याचे तुकडे करणे आणि ग्राहकांना देताना थेट हाताळणी होत असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम असणे आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन होणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com