Bicholim News : दिव्यांगांसह वृद्धांंकडून मतदान; डिचोलीत अनेकांकडून समाधान

Bicholim News : निवडणूक पथकांनी आज (सोमवारी) त्यांना नेमून दिलेल्या पंचायत क्षेत्रात जाऊन संबंधीत ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांकडून मत पत्रिकेद्वारा मतदान करुन घेतले.
Bicholim
BicholimDainik Gomatnak

Bicholim News :

डिचोली, दिव्यांग तसेच ८५ वर्षांवरील वृद्धांसाठी घरबसल्या मतदान करण्याच्या मोहिमेला डिचोलीत उत्स्फूर्तपणे सुरवात झाली.

येत्या ३ मेपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक पथकांनी आज (सोमवारी) त्यांना नेमून दिलेल्या पंचायत क्षेत्रात जाऊन संबंधीत ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांकडून मत पत्रिकेद्वारा मतदान करुन घेतले.

डिचोली तालुक्यातील डिचोलीसह साखळी आणि मये या तिन्ही विधानसभा मतदारसंघात ही मोहीम सुरु झाली आहे. घरबसल्या मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आल्याने वृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

Bicholim
PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

पथक पोहचले घरोघरी

डिचोली विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ८२ वृद्ध तर ४८ दिव्यांग मिळून १३० मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. साखळी आणि मये मतदारसंघातही वृद्ध आणि दिव्यांग मिळून प्रत्येकी शंभरहून अधिक मतदार असल्याची माहिती मिळाली आहे.

तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांकडून मतदान करुन घेण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी प्रयत्नशील आहे. आज सोमवारी डिचोली मतदारसंघातील मेणकूरे, अडवलपाल आणि लाटंबार्से पंचायत क्षेत्रात निवडणूक पथकातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह निवड केलेल्या घरोघरी जाऊन मतदान प्रक्रिया केली.

मला धड उभे राहता येत नसल्याने मतदानासाठी मतदान केंद्रावर जाताना अनेक अडचणी येत होत्या. व्हीलचेअर आणि इतरांची मदत घ्यावी लागत असे. या लोकसभेसाठी घरबसल्या मतदान करण्याची व्यवस्था केल्याने निवडणूक आयोगाला धन्यवाद. यापुढेही प्रत्येक निवडणुकीवेळी अशी व्यवस्था असावी. त्यामुळे माझ्यासारख्या दिव्यांगांना लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावणे सोपे होणार आहे.

-राजेंद्र राणे,

दिव्यांग मतदार, वडावल.

Bicholim
Ibrahim Palak Goa Viral Video: स्लो मोशन में! सैफचा मुलगा अन् श्वेता तिवारीची मुलगी प्रेमात, गोवा रिटर्न व्हिडिओ व्हायरल

वास्कोतही मिळाला प्रतिसाद

वास्को मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, मुरगाव या चारही मतदारसंघातील दिव्यांगांसाठी घरात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मुरगाव तालुक्यातील चारही मतदारसंघात ही प्रक्रिया पार पडली. कुठ्ठाळी मतदारसंघात ८५ वर्षांवरील ११० मतदारांपैकी ३१ जणांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.

तर ४५ दिव्यांगव्यक्ती पैकी २४ जणांनी मतदान केले. एकूण ५५ जणांची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. दाबोळी मतदारसंघातील ५० ज्येष्ठांपैकी ३५ जणांची मतदान प्रक्रिया झाली तर दिव्यांग १८ पैकी १४ जणांची मतदान प्रक्रिया झाली. वास्को मतदार संघात ७१ ज्येष्ठांपैकी ३४ तर २० दिव्यांगांपैकी ७ जणांनी मतदान केले. मुरगाव तालुक्यात ८५ वर्षावरील २६७ मतदार असून १२७ दिव्यांग तर ८५ वर्षावरील २६७ मतदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com