Sambhaji Bhide: 'भगवा ध्वज प्रत्येक देशवासीयाचा प्राण'! संभाजी भिडे यांच्या हस्ते ध्वजस्तंभांचे लोकार्पण; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Sambhaji Bhide Goa Visit: शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे कुळणेश्वर मंदिर आणि वन येथील नित्यानंद स्वामी मठात मिळून दोन ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत.
Sambhaji Bhide Goa Visit
Sambhaji Bhide Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज असून तो प्रत्येक देशवासीयांचा प्राण आहे. त्यामुळे भगव्याचा मान राखून त्याचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.

यावेळी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. आयडीसी येथील कुळणेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे कुळणेश्वर मंदिर आणि वन येथील नित्यानंद स्वामी मठात मिळून दोन ठिकाणी ध्वजस्तंभ उभारण्यात आले आहेत. रविवारी कुळणेश्वर मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाची भिडे यांनी विधीवत पूजा करून ध्वज फडकावला.

Sambhaji Bhide Goa Visit
Sambhaji Bhide In Goa: संभाजी भिडेंचे महात्‍मा गांधी, तिरंगा विषयावर प्रक्षोभक वक्तव्य, हिंदूंना चिथावणी

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक गुंजन कोरगावकर कुळणेश्वर, देवस्थान समितीचे अध्यक्ष दीपक मांद्रेकर, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे मंदार गावडे, सिद्धेश्वर नाईक, गोविंद साखळकर, पापूराज मयेकर, शैलेश जाधव, चंदू नार्वेकर, रोहन देसाई, सूर्यकांत देसाई, गायत्री पाटील,

राजेंद्र सावईकर, घन:श्याम कुंकळकर आदी उपस्थित होते. किरण तुळपुळे यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले. तद्नंतर भिडे यांनी वन-म्हावळींगे येथील टेकडीवरील श्री नित्यानंद मठ मंदिराजवळ उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचे अनावरण केले.

Sambhaji Bhide Goa Visit
Sambhaji Bhide Goa Visit: संभाजी भिडेंचे दवर्लीत व्याखान, प्रसारमाध्यमांसह गोवेकरांचे कार्यक्रमाकडे लक्ष

मुख्यमंत्र्यांची भेट

संभाजी भिडे यांनी रविवारी साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या महान योगदान व कार्याबाबत सरकारने जागृती करावी, अशी मागणी यावेळी भिडे यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्‍याकडे केली. डिचोली येथे आयोजित हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावलेल्या भिडे गुरुजी यांनी डिचोलीतील कार्यक्रम संपल्यावर साखळी येथील पद्मिनी फाऊंडेशन, साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com