Sambhaji Bhide Goa Visit: संभाजी भिडेंचे दवर्लीत व्याखान, प्रसारमाध्यमांसह गोवेकरांचे कार्यक्रमाकडे लक्ष

सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक
Sambhaji Bhide
Sambhaji Bhidedainik gomantak

Sambhaji Bhide राज्यात सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक बनलेले असतानाच वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले संभाजी भिडे यांना दवर्ली येथे गुरुवारी व्याखानासाठी पाचारण करण्यात आले आहे. दवर्लीतही मध्यंतरी धार्मिक तणाव निर्माण झाला होता.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक भिडे यांचे दवर्ली - मडगाव येथील समर्थ गडावर गुरुवारी २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ३ वाजता व्याख्यान होणार आहे. सांकवाळ येथे चर्चच्या आवारात मूर्ती बसवण्याचा प्रकार झाला, करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, खुद्द दवर्ली येथेही धार्मिक तणाव निर्माण झाला होता.

कळंगुट येथील पुतळा हटाव प्रकरणाने तर राज्याचेच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले होते. समान नागरी कायदा असलेल्या राज्याची सामाजिक व धार्मिक सौहार्दासाठी वेगळी ओळख असताना त्याला नख लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या वातावरण गढूळ झालेले असतानाच भिडेंच्या व्याख्यानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sambhaji Bhide
Vishwajit Rane: खेड्यांतील लोकांनाही शहरी सुविधा हव्याच; यापुढे प्रादेशिक नव्हे तर क्षेत्रीय आराखडा

सत्ताधारी भाजपने या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली आहे. करासवाडा येथे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी भेट देऊन केलेले वक्तव्य चूकच असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

मध्यंतरी ख्रिस्ती धर्मगुरू बोलमॅक्स परेरा यांनी ‘शिवाजी हा तुमचा देव आहे की योद्धा आहे, अशी विचारणा हिंदूंना करा’ असे चर्चमध्ये म्हटल्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवल्यानंतर वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू झालेली असतानाच करासवाडा येथे मूर्तीची तोडफोड झाली.

Sambhaji Bhide
Vishwajit Rane: मुख्यमंत्री बनण्याच्या चर्चेवर राणेंचे विधान, 'ही काल्पनिक चर्चा काहीच फायद्याची नाही, कारण...

भिडे हेही नेमके छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान देणार असल्याने ते व्याख्यान स्फोटक असेल याचे अनुमान आताच काढता येत आहे.

काही दिवसांपूर्वी चिखलीतील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांनीसुद्धा शिवरायांबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केले होते. विधानसभा अधिवेशनात आमदार क्रुझ सिल्वा यांनी शिवजयंती साजरी करण्यावरून खर्चाचा मुद्दा उपस्थित केला होता.

कळंगुटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरूनही वाद उफाळला होता. या सर्व पार्श्र्वभूमीवर संभाजी भिडे यांचे मडगावातील आगमन व त्यांच्या व्याख्यानामुळे काय परिस्थिती निर्माण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com