UTAA: ‘उटा’च्या द्विदशकपूर्तीचा नियोजनबद्ध कार्यक्रम! 'राखणदारा'च्या प्रवेशाने उत्साहात भर; युरींची मात्र अनुपस्थिती

Bicentenary celebrations of UTAA: राज्यभरातील सुमारे वीस ते पंचवीस हजारांचा जमाव फर्मागुढी येथे जमा झाला तो ‘उटा’च्या द्विदशकपूर्ती सोहळ्याला. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी सातच्या सुमारास आटोपला, पण उपस्थित जमावाने खुर्चीवरून न उठता शांतपणे कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
UTAA 20th Commemoration Programme, united tribal association alliance
Bicentenary celebrations of UTAADainik Gomantak
Published on
Updated on

UTAA 20th Commemoration Programme

फोंडा: राज्यभरातील सुमारे वीस ते पंचवीस हजारांचा जमाव फर्मागुढी येथे जमा झाला तो ‘उटा’च्या द्विदशकपूर्ती सोहळ्याला. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी सातच्या सुमारास आटोपला, पण उपस्थित जमावाने खुर्चीवरून न उठता शांतपणे कार्यक्रमाला उपस्थिती लावली. भर दुपारी तीनच्या सुमाराला आदिवासी बांधव बसले होते, ते संध्याकाळी सातला खुर्चीवरून उठले. यावेळी शिस्तीचा प्रभाव जाणवला.

नियोजनबद्धरीत्या हा कार्यक्रम झाला. मात्र, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव या कार्यक्रमाला दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचे कारणही समजू शकले नाही, तरीपण काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी उपस्थिती लावली आणि तेही अल्पावधीत निघून गेले. या कार्यक्रमाला भाजपचे मुख्यमंत्री आणि विरोधी काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने लोकांनाही कुतुहल होते.

‘आक्रोश’चे सादरीकरण

मुख्य कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ‘आक्रोश’ या लघुपटाचे सादरीकरण झाले, तर मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘उटा उजवाडाची वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठासमोर आदिवासींच्या आंदोलनात हुतात्मा झालेले मंगेश गावकर व दिलीप गावडे यांच्यासह बिरसा मुंडाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.

UTAA 20th Commemoration Programme, united tribal association alliance
'Cash For Job' चे आणखी एक प्रकरण! शिक्षण खात्यात नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक; संशयितास अटक

उद्‍घाटनावेळी ‘राखणदारा’चा प्रवेश

उद्‍घाटनावेळी राखणदाराचा प्रवेश लक्षणीय ठरला. राखणदाराच्या हातातील मशाल मुख्यमंत्र्यांनी प्रज्वलित केली. ढोलताशांचा निनाद वातावरणाला एक वेगळा ‘फील’ देऊन गेला. एकंदर शिस्तीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थिती लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com