

वास्को: ‘एनएसडी’समोरच्या रस्त्याकडेला असलेला वटवृक्ष तेथून हटवून बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला त्याची पुनर्लागवड करण्यात आली.
येथील दाबोळी-बोगमाळो ते एमईएस चौकादरम्यान रस्ता रुंदीकरण तसेच उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारा रस्ताकडेचा हा वटवृक्ष हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या वटवृक्षाच्या खाली एक लहान घुमटी होती.
जर वटवृक्ष हटविण्यात आला, तर ती घुमटीही हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने काहीजणांनी त्याला विरोध केला होता. ती घुमटी आणि वटवृक्षाशी आमच्या भावना निगडित असल्याने तो वटवृक्ष आणि घुमटी हटवू नये, अशी मागणी काहीजणांनी केली होती. मात्र, तेथील घुमटी प्रथम हटवून समोरच्या रस्त्याकडेला असलेल्या मोकळ्या जागेत हलविण्यात आली. तेथे मोठ्या आकाराच्या घुमटीत तेथील देवप्रतिमा ठेवण्यात आल्या.
पणजीत गुरुवारी ऊर्जा विषयक कार्यशाळा
हवामान बदलाचा वाढता धोका ओळखून गोवा सरकारने ‘मिशन लाइफ’ अंतर्गत व्यापक जनजागृतीसाठी वक्ते प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत बाल भवन सभागृह, कांपाल येथे हे शिबिर होणार आहे. पहिले येणाऱ्या १०० जणांना यात प्रवेश असेल.
ऊर्जा बचत, पाणी बचत, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार, कचरा कमी करणे, विद्युत-कचरा कमी करणे, आरोग्यदायी जीवनशैली, शाश्वत अन्नपद्धती यांचा प्रसार करून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
वक्ते प्रशिक्षण शिबिरात राज्यातील १०० उत्साही नागरिकांना प्रशिक्षित करून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रशिक्षित वक्ते महाविद्यालये व शैक्षणिक केंद्रांवर हवामान जतन विषयक मार्गदर्शन, संवाद व दिशा देण्याचे काम करतील. मार्गदर्शक म्हणून प्रख्यात सौरऊर्जा तज्ज्ञ प्रा. चेतनसिंह सोलंकी मार्गदर्शन करतील. ‘ऊर्जा स्वराज’ ही संकल्पना मांडणारे सोलंकी यांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या बसमधून सुरू असलेले ११ वर्षांचे जनजागृती अभियान हवामान संरक्षणाचा संदेश पोहोचवते आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.