MLA Subhash Phaldesai सुभाष फळदेसाईंवर शुभेच्‍छांचा वर्षाव; मुख्‍यमंत्र्यांकडून स्‍तुतिसुमने

वाढदिवस उत्‍साहात : विविध विकासकामांचा शुभारंभ;
MLA Subhash Phaldesai
MLA Subhash Phaldesai Dainik Gomantak

सांगे मतदारसंघाला सुभाष फळदेसाई यांच्या रुपाने एक धडाडीचा आमदार मिळाला आहे. त्यांची काम करण्याची शैली व आपल्‍या मतदारसंघाचा विकास करण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास याला तोड नाही, असे प्रशंसोद्‌गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. समाजकल्‍याणमंत्री फळदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवारी (२० ऑगस्‍ट) आयोजित कार्यक्रमात त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍यावर मुख्‍यमंत्री बोलत होते.

MLA Subhash Phaldesai
Goa Gram Panchayat: वादग्रस्त बांधकामांसंदर्भात गरमागरम चर्चा

कावरे-पिर्ला पंचायतीच्या नवीन सुसज्ज घराचे उद्‌घाटन, कुर्डी व मळकर्णे पंचायतघराची पायाभरणी, ट्रायबल वेलनेस सेंटर, सळावली पर्यटन कुटिरांचे उद्‌घाटन व मुख्य म्हणजे वाडे, नेत्रावळी, मायणा व मळकर्णे या चार विद्यालयांमध्‍ये इ-स्कूलचे उद्‌घाटन ही आमदार फळदेसाई यांनी अवघ्या दीड वर्षात सांगे मतदारसंघासाठी केलेली कामे आहेत. येणाऱ्या काही महिन्यांत साळावली धरणग्रस्त विस्थापित लोकांचा प्रश्‍‍न मार्गी लावणार आहे, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कृषीमंत्री रवी नाईक, सभापती रमेश तवडकर, आमदार राजेश फळदेसाई, डॉ. दिव्या राणे, गणेश गावकर तसेच अनेक मान्‍यवरांनी उपस्‍थिती लावून आमदार फळदेसाई यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. लोकांनीही सकाळपासून मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आपल्‍या लाडक्‍या नेत्‍यावर शुभेच्‍छांचा वर्षाव केला.

MLA Subhash Phaldesai
Leopard Attack On Dog: तुये गावात बिबट्याची दहशत; 2 कुत्र्यांवर हल्ला; एकाचा फडशा

सुभाष फळदेसाई हे २०१२ साली प्रथम सांगे मतदारसंघातून निवडून आले. त्यावेळी त्यांनी अनेक विकासकामे चालीस लावली. पण नंतर २०१७च्‍या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने सर्व कामे ठप्प पडली. यामुळे फळदेसाई यांचे नुकसान झाले नाही तर सांगेवासीयांचे नुकसान झाले. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरूवात झालेली कामे आज त्यांच्याच हाताने मार्गी लागली हे लोकांनी लक्षात घ्‍यावे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

आगामी विधानसभा निवडणुकीत सांगे मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला तरी मला कोणताच फरक पडणार नाही. ज्या व्‍यक्तीला पक्ष उमेदवारी देईल त्याच्यासाठी मी काम करेन. या पाच वर्षांत मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यावर माझा भर आहे व असेल. मतदारसंघातील लोकांसाठी मी सदैव उपलब्ध असेन.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्‍याणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com