Leopard Attack On Dog: तुये गावात बिबट्याची दहशत; 2 कुत्र्यांवर हल्ला; एकाचा फडशा

बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा ग्रामस्थांची मागणी
Leopard Attack On Dog
Leopard Attack On DogDainik Gomantak

तुये पंचायत क्षेत्रातील सोणये-पालये येथील जेनिफर डिसोझा यांच्या घराच्या गॅलरीत बसलेल्‍या कुत्र्यावर आज पहाटे साडेपाचच्‍या सुमारास बिबट्याने हल्ला केला. कुत्रा ओरडतो म्हणून जेनिफर बाहेर आल्‍या तेव्‍हा बिबट्याने कुत्र्याला तेथेच टाकून पळ काढला.

Leopard Attack On Dog
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाची रचना कशी होती माहितीये का?

तशीच घटना कालही घडली. एल्‍सी डिसोझा यांच्या घराच्या गॅलरीत असलेल्‍या कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना सलग दोन दिवस भरवस्तीत घडल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहे.

याबाबत बोलताना या महिलांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, घरातील कर्तेसवरते लोक कामानिमित्त बाहेरगावी असल्‍यामुळे व घरात लहान मुलं असल्‍यामुळे बिबट्याची खूप भीती वाटते.

Leopard Attack On Dog
Goa Student : पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा जल्लोष

या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी त्‍यांनी केली. विकासाच्या नावावर डोंगरमाळरानावरील झाडे कापली जातात. त्यामुळे बिबटे लोकवस्तीत घुसत आहेत.

स्थानिक पंचसदस्य उदय मांजरेकर म्‍हणाले की, जंगली जनावरे रोज लोकवस्तीत येऊ लागली आहेत. पाळीव प्राण्‍यांबरोबरच आता माणसांचाही जीव धोक्यात आला आहे. मागच्या सहा वर्षांपासून तुये परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्‍याचा बंदोबस्‍त करणे गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com