Child Trafficking: धक्कादायक! सांगलीच्‍या 2 वर्षीय मुलीची गोव्‍यात 4.5 लाखांना विक्री, बेळगाव पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

Child Trafficking Racket: सांगलीतील दोन वर्षांच्या मुलीची गोव्यात विक्री करणाच्या रॅकेटचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी बुधवारी (ता. ८) केला.
Child Trafficking: सांगलीच्‍या 2 वर्षीय तान्हुलीची गोव्‍यात 4.5 लाखांना विक्री, पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: सांगलीतील दोन वर्षांच्या मुलीची गोव्यात विक्री करणाच्या रॅकेटचा पर्दाफाश बेळगाव पोलिसांनी बुधवारी (ता. ८) केला. यात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोघे, बेळगावातील एक आणि गोव्यातील एक अशा एकूण सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चिमुरड्या बालिकेचा व्यवहार साडेचार लाखांमध्ये झाला होता, अशी धक्कादायक माहिती चौकशीत पुढे आली आहे.

राजेंद्र मेत्री, शिल्पा राजेंद्र मेत्री (दोघे रा. सांगली), स्‍मिता ज्ञानेश्‍वर वाडीकर (गोवा), वंदना परशुराम सुर्वे (बेळगाव), रवी राऊत आणि राणी राऊत (सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्‍या माहितीनुसार, कवठेमहांकाळ येथील संशयित राजेंद्र व शिल्पा मेत्री यांनी मूळच्या रामनगर आणि सध्या राहणार गोवा (Goa) येथील रहिवासी स्मिता वाडीकर यांना साडेचार लाख रुपयांना दोन वर्षाच्या मुलीची विक्री केली होती. या प्रकरणात वंदना सुर्वे, रवी राऊत व राणी राऊत यांनी मध्यस्थी केली होती.

Child Trafficking: सांगलीच्‍या 2 वर्षीय तान्हुलीची गोव्‍यात 4.5 लाखांना विक्री, पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश; 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
Goa Human Trafficking: वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून पळवून आणलेल्‍या तरुणीची सुटका, मडगावात पोलीस बनले देवदूत

बेळगावात चाईल्ड लाईन १०९८ स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आहे. या एनजीओकडे सांगलीतील (Sangli) दोन वर्षांच्या मुलीची गोव्यात विक्री झाल्याची तक्रार करण्‍यात आली आली. यामुळे बेळगाव येथील साहाय्यवाणी केंद्राच्या प्रतिनिधींनी मुलीची खरेदी केलेल्या गोव्यातील स्मिता वाडीकर हिला फोन करून बाल कल्याण समितीपुढे हजर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १७ डिसेंबर २०२४ रोजी मुलीला बेळगावात समितीपुढे हजर करण्यात आले. वाडीकर हिने चौकशीत या मुलीची खरेदी साडेचार लाखांत केल्याचे सांगितले. त्यासाठी तिघांनी मध्यस्थी केल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com