Goa Agriculture: अडचणी जाणून घ्या, युवा पिढीला प्रोत्साहित करा

Goa Agriculture: शेतकऱ्यांची मागणी: कृषी धोरणाबाबत बैठक
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Agriculture: नवीन कृषी धोरण तयार करण्यापूर्वी गावागावांत जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घ्या. पडीक शेतजमिनी लागवडी आणण्यासाठी काय करता येईल. त्याचे नियोजन करा. त्याचबरोबर आजच्या पिढीला शेती व्यवसायाकडे प्रोत्साहीत करण्यासाठी खास योजना सुरु करा. आदी मुद्दे डिचोलीतील शेतकऱ्यांनी कृषी बैठकीत उपस्थित केले.

Goa Agriculture
Minister Sudin Dhavalikar: वीज व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार

सरकारतर्फे नवीन कृषी धोरण तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे धोरण नेमके कसे असावे, त्याबद्दल शेतकऱ्यांची मते आणि सूचना जाणून घेण्यासाठी कृषी खात्यातर्फे राज्यभर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी अधिकारी नीलिमा गावस, उदय भाटे, फार्मर्स सहकारी संस्थेचे विश्वंभर गावस, सरपंच गुरूदास परब, सरपंच पद्माकर मळीक, उदय साळगावकर, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, विविध पंचायतींचे सरपंच आणि पंचसदस्य सहायक कृषी अधिकारी, दीपक गडेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Goa Agriculture
Goa Accident Case: अपघातांचे ग्रहण काही सुटता सुटेना!

मायनिंगमुळे शेती धोक्यात

खाण व्यवसायामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. नुकसानीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. अशी खंत मयेतील शेतकरी सखाराम पेडणेकर यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची ही मोठी समस्या दूर करण्यासाठी कृषी खात्याने जबाबदारी घ्यावी. खाणव्याप्त क्षेत्रातील शेती वाचविण्यासाठी कृषी धोरणात तरतूद व्हायला हवी. अशी सूचनाही त्यांनी केली. खाण व्यवसायामुळे नैसर्गिक जल स्रोते नष्ट झाली आहे. शेती-बागायतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही. अशी खंत मुळगाव येथील शेतकरी वसंत गाड यांनी व्यक्त केली.

युवा पिढीला प्रोत्साहित करा

शेती व्यवसाय किफायतशीर असला, तरी आजची पिढी निरुत्साही आहे. शेती हा पैसा मिळवून देणारा व्यवसाय आहे. असा जोपर्यंत विश्वास बसत नाही. तोपर्यंत युवा पिढी शेतीकडे आकर्षित होणार नाही. असे मत विश्वंभर गावस यांनी व्यक्त करुन युवा पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी धोरण निश्चित करावे. योजना केवळ कागदोपत्री नसाव्यात. अशी सूचनाही त्यांनी केली. अडवलपाल येथील बागायतदार नितीन सामंत यांनी तर कृषी खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com