Beef Supply In Goa: दोन दिवसांच्या टंचाईनंतर गोव्यात गोमांस पुरवठा पूर्ववत

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गोमांसाची उपलब्धता कमी झाली होती, ज्यामुळे अनेकांना गोमांस पुरवठा होत नव्हता.
Beef Supply In Goa
Beef Supply In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गोमांसाची उपलब्धता कमी झाली होती, ज्यामुळे अनेकांना गोमांस पुरवठा होत नव्हता. बेळगावमधून होणाऱ्या गोमांस पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे अनेकांना मांस स्टॉल बंद करावा लागला, असं दक्षिण गोव्यातील मांस विक्रेत्यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

ऑल गोवा बीफ ट्रेडर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शब्बीर बेपारी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले की, "गोव्यात बेळगावमधून मोठ्या प्रमाणात गोमांस येत. येथील गोमांस पुरवठादारांनी रमजान जवळ आल्यामुळे मध्य पूर्वेकडून होणार्‍या मागणीकडे लक्ष केंद्रित केले आहे. रमजान 1 मार्चपासून सुरू होणार आहे."

"रमजान महिन्यात काही देशांमध्ये गोमांस आणि इतर मांस उत्पादनांच्या मागणीत वाढ होते. त्यांची खरेदी क्षमता गोव्यापेक्षा जास्त असल्यामुळे, पुरवठादारांनी या निर्यात मागणीला प्राधान्य देऊन दोन महिन्यांत त्यांचा कोटा पूर्ण करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे कर्नाटक आणि गोव्यात गोमांस संकट आहे," असं शब्बीर बेपारी यांनी सांगितले.

Beef Supply In Goa
Goa Crime: कार अडवून चालकास लोखंडी पाईपने मारहाण, दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

"गोमांस पुरवठादारांना सध्या निर्यातीसाठी पाचपट जास्त पैसे मिळत आहेत. आम्ही त्या दरांशी स्पर्धा करू शकत नाही," असे एका विक्रेत्याने द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

रमजान सणाच्या काळात दुबई, कतार, ओमान, कुवेत आणि सौदी अरेबियामध्ये गोमांसाची मागणी जास्त असते. तसेच इजिप्त, मलेशिया आणि फिलीपिन्समध्येही ही मागणी जास्त आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी, दिल्ली आणि महाराष्ट्रातील देशातील प्रमुख निर्यातदार या काळात पुढे येतात.

"मांस पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू झाला आहे. व्यापारी नेहमीप्रमाणे गोमांसासाठी 280 रुपये प्रति किलो आणि हाड नसलेल्या गोमांसासाठी 380 रुपये प्रति किलो या किमतीत गोमांस विकत आहेत. किमतीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीय," असे ऑल गोवा बीफ ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस अन्वर बेपारी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले.

Beef Supply In Goa
Goa News: हेच खरे गोंयकारपण! कॅबमध्ये सापडली 5 लाख रुपये असलेली बॅग, चालकाने जर्मन पर्यटकाला केली परत

"गोमांसाचे दर कॉर्पोरेट्सद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे आम्ही ज्या किमतीला पशुधन खरेदी करतो त्या किमतीत आपोआप वाढ होते. याचा परिणाम गोव्यातील व्यापाऱ्यांवर होतो. आम्ही तोट्यात मांस विकू शकत नाही. गोव्यातील गोमांस पुरवठ्यावर काही दिवस परिणाम झाला," असे बेळगाव येथील गोमांस पुरवठादाराने द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

रमजान हंगाम जवळ येत असल्यामुळे पुरवठादार आणि विक्रेते दोघेही येत्या आठवड्यांतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com