Goa Crime: कार अडवून चालकास लोखंडी पाईपने मारहाण, दोन लाखांचा ऐवज लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद

Violent Carjacking Goa: कुठ्ठाळी येथील विजयन थोट्टारयथ यांची कार अडवून त्यांना मारहाण केल्यावर त्यांचा मोबाईल , सोनसाखळी व रोख दहा हजार घेऊन पळ काढणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
Goa Theft Case
Theft CrimeCanva
Published on
Updated on

Driver Assaulted, ₹2 Lakh Stolen in Cortalim

वास्को: कुठ्ठाळी येथील विजयन थोट्टारयथ यांची कार अडवून त्यांना लोखंडी पाइपने मारहाण केल्यावर त्यांचा मोबाईल फोन, गळ्यातील सोनसाखळी व रोख दहा हजार रुपये घेऊन आपल्या कारने पळ काढणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींविरोधात वेर्णा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही घटना व्यवसायातील वैमनस्यातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे केरळचे तथापि सध्या कुठ्ठाळी येथे राहणारे विजयन हे आठ जानेवारीला सव्वापाचच्या दरम्यान आपल्या ईको कारने मडगावला चालले होते. ते सतांत्र, कुठ्ठाळी येथे एका गॅरेजजवळ पोचले असता एका इनोव्हा कारचालकाने आपली कार चुकीच्या दिशेने त्याच्या कारच्यासमोर आडवी घातली.

Goa Theft Case
Goa Crime: कळंगुटमध्ये तोतया FDA अधिकाऱ्याचा उच्छाद, अन्न व्यवसायिकांना देतोय धमकी; मंत्री राणेंनी दिली माहिती

त्यानंतर त्या कारमधून तोंडावर मास्क घातलेला, हाफ पँट व टी शर्ट परिधान केलेला एक युवक उतरला. त्याच्या हातात लोखंडी पाइप होता. त्याने विजयनच्या कारच्या पुढील काचेवर लोखंडी पाइप मारून फोडली. त्याच्यासमावेत असलेला दुसराही हातात लोखंडी पाइप घेऊन तेथे आला. त्यानेही आपला चेहरा मास्कने झाकला होता.

Goa Theft Case
Ponda Crime: बनावट उत्पन्न दाखला दिल्याप्रकरणी नगरसेवकासह दोघांना अटक; मुख्याधिकाऱ्यांच्या खोट्या सहीची बनवेगिरी उघड

त्याने हाफ पँट व टी शर्ट घातले होते. त्यानंतर त्या दोघांनी विजयनला मारहाण करण्यास आरंभ केला. त्यांच्या उजव्या मांडीवर, उजव्या मनगटावर तसेच डोक्यावर लोखंडी पाइप मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांनी विजयन याच्याकडील सॅमसन मोबाईल हँडसेट, दहा हजार रुपये रोख, सोनसाखळी असा सुमारे दोन लाखांचा ऐवज काढून घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com