Barch Club Fire Accident: 'बर्च' क्लब आग दुर्घटना अपघाती? लुथरा बंधूंच्या जामिनावर बचाव पक्षाचा युक्तिवाद

Barch Club Fire Accident: हडफडे येथील ‘बर्च’ क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ व गौरव लुथरा यांच्या नव्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी सविस्तर सुनावणी झाली.
Barch Club Fire Accident
Barch Club Fire AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च’ क्लब आग दुर्घटना प्रकरणातील संशयित आरोपी सौरभ व गौरव लुथरा यांच्या नव्याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात मंगळवारी सविस्तर सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षाने ही घटना पूर्णपणे अपघाती असल्याचा युक्तिवाद केला.

बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले की, दुर्घटनेच्या वेळी अशील गोव्यात नसून दिल्लीत होते. क्लबचे दैनंदिन कामकाज व व्यवस्थापन पाहण्यासाठी मॅनेजर तसेच इतर कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. संबंधित इमारत २००४ पूर्वीपासून अस्तित्वात असून ती नव्याने बांधण्यात आलेली नाही, केवळ तिचे नूतनीकरण करण्यात आले होते, असेही बचाव पक्षाने नमूद केले.

Barch Club Fire Accident
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

दुर्घटनेच्या वेळी सुमारे १५० हून अधिक जण सुरक्षितपणे बाहेर पडले. मृत्यू भाजल्यामुळे नव्हे, तर गुदमरल्याने झाल्याचा दावा बचाव पक्षाने केला. मृतांमध्ये बहुतांश हॉटेल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचेही वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेले सौरभ व गौरव लुथरा यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. सकाळी व दुपारच्या सत्रात बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना जामीन अर्जाच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

Barch Club Fire Accident
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

वेळेअभावी सरकारी पक्षाचा युक्तिवाद होऊ शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडी कायम ठेवत पुढील सुनावणी बुधवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com