Bank Holiday: चेक क्लिअरन्स, कॅश विड्रॉल... जे काही असेल ते आजच करा; कारण पुढचे 4 दिवस बँका राहणार बंद! कारण...

Bank Holiday: जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम प्रलंबित असेल, तर ते आजच तातडीने उरकून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
Bank Holiday
Bank HolidayDainik Gomantak
Published on
Updated on

जर तुमचे बँकेत काही महत्त्वाचे काम प्रलंबित असेल, तर ते आजच तातडीने उरकून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण उद्यापासून सलग चार दिवस देशभरातील बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. २४ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत बँका बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुट्ट्यांचे गणित आणि जोडून आलेला संप

बँका सलग चार दिवस बंद राहण्यामागे सुट्ट्यांचे एक विशेष समीकरण जुळून आले आहे. शनिवार, २४ जानेवारी रोजी महिन्याचा 'चौथा शनिवार' असल्याने बँकांना सुट्टी आहे. त्यानंतर २५ जानेवारीला रविवारची साप्ताहिक सुट्टी येत आहे. सोमवार, २६ जानेवारी रोजी संपूर्ण देश 'प्रजासत्ताक दिन' साजरा करणार असल्याने या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशाप्रकारे सलग तीन दिवस सुट्ट्यांची साखळी तयार झाली आहे.

Bank Holiday
New BJP President Goa Visit: भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर!

मंगळवारी बँका का बंद राहणार?

खरे तर २७ जानेवारी (मंगळवार) रोजी अधिकृत सुट्टी नाही, तरीही त्या दिवशी बँकांचे कामकाज होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप. बँकिंग क्षेत्रात 'पाच दिवसांचा कार्यआठवडा' लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारने दिरंगाई केल्याचा आरोप करत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संपाचे हत्यार उपसले आहे.

गोवा राज्य समन्वयक संतोष हळदणकर यांनी माहिती दिली की, कर्मचारी आणि अधिकारी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याने मंगळवारीही बँकांचे शटर डाऊनच राहणार आहे.

Bank Holiday
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

सलग चार दिवस बँका बंद असल्याने चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे किंवा काढणे आणि इतर महत्त्वाची कामे रखडू शकतात. डिजिटल बँकिंग आणि यूपीआय सेवा सुरू राहतील, तरीही रोख रकमेसाठी एटीएममध्ये तुटवडा भासू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आजच आवश्यक ती तयारी करून ठेवावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com