Bank Employees Strike: '5 दिवसांचा आठवडा' मान्य करा, अन्यथा 28 सप्टेंबरपासून पुन्हा संप! पणजीत बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन; 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा

Bank Employees Strike September 28 2026: यूपीआय, एटीएम आणि इंटरनेट बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष व्यवहारांसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे.
Bank Employees Strike September 28 2026
Bank Employees StrikeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आठवड्यात पाच दिवस कामकाजाची मागणी मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुन्हा संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती गोवा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे गोवा विभाग समन्वयक संतोष हळदणकर यांनी दिली. संपानंतरही मागणी मान्य झाल्यास २६ ऑक्टोबरपासून बँक कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असेही त्यांनी सांगितले.

ते आझाद मैदानावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी मॅक्सी परेरा यांच्यासह अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यूपीआय, एटीएम आणि इंटरनेट बँकिंगसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष व्यवहारांसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. आरबीआय तसेच बँकिंग क्षेत्रातील इतर कार्यालयांमध्ये शुक्रवारपर्यंतच कामकाज चालते.

Bank Employees Strike September 28 2026
Goa Police: गोवा पोलिस दलात आतापर्यंतचे मोठे फेरबदल; IPS अधिकाऱ्यांसह 12 महत्वाच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मग बँक कर्मचाऱ्यांनाच महिन्यातील दोन शनिवार काम का करावे लागतात, असा सवाल हळदणकर यांनी केला. बँकांमध्ये कामाचा ताण अधिक असून कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. शनिवारची सुट्टी देण्याच्या बदल्यात दररोज अतिरिक्त काम करण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी दाखविली आहे. तरीही सरकार आमच्या मागण्यांकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘पीएलआय’ योजनेतील भेदभाव दूर करा

नोव्हेंबर २०२० मध्ये सरकारने ‘पीएलआय’ योजना लागू केली. या योजनेअंतर्गत बँकेचा लाभांश सर्व कर्मचाऱ्यांमध्ये विभागला जात होता. मात्र, आता स्केल ४ ते ७ मधील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते, तर इतर कर्मचाऱ्यांना तुटपुंजी रक्कम मिळते. हा भेदभाव दूर करून सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभांश देण्यात यावा, अशी मागणी मॅक्सी परेरा यांनी केली.

Bank Employees Strike September 28 2026
Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

बँकांमध्ये सुमारे ८ लाख कर्मचारी कार्यरत असून, त्यापैकी सुमारे ४० हजार अधिकारी आहेत. नव्या पीएलआय योजनेत या अधिकाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे २० पट अधिक लाभांश दिला जात असल्याचा दावा परेरा यांनी केला. त्यामुळे पीएलआय योजना पूर्ववत राबविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com