GMC: 'गोमेकॉ'बाहेरील रस्त्याला फास्टफूड वाहनांचा वेढा! अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी; रुग्णवाहिकांना होतोय अडथळा

GMC Road Encroachment: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेर असलेल्या बेकायदा मोबाईल फास्टफूडच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
Goa GMC Road
Goa Medical College RoadDainik Gomantak
Published on
Updated on

GMC Road Traffic Issue

पणजी: बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाबाहेर असलेल्या बेकायदा मोबाईल फास्टफूडच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तेथील पदपथावर व रस्त्यावर टेबल-खुर्च्या घालून अतिक्रमण केले जात आहे.

सांताक्रुझ पंचायत तसेच बांबोळी पोलिस चौकीचा आशीर्वाद या फास्टफूडधारकांना असल्याने वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहन पार्किंग तसेच हे अतिक्रमण यामुळे अनेकदा रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होण्याचे प्रकार घडले आहेत. ही फास्टफूड वाहनांविरोधात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी वाहन चालकांकडून होत आहे.

या इस्पितळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे पूर्वीच्या भाजी व फळे विक्रेत्यांना तेथून हटवून त्यांना कायदेशीर गाळे देण्यात आले आहेत. ही कारवाई दोन वर्षापूर्वी झाली होती.

मात्र कालांतराने पुन्हा नव्याने भाजी व फळे विक्रेत्यांनी तेथे ठाण मांडले आहे. सांताक्रुझ तसेच कुडका पंचायतीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळेच या विक्रेत्यांचे फावले आहे. पंचायतीच्या काही सदस्यांचे सगेसोयरे तेथे व्यापार करत असल्याने कोणीच कारवाई इच्छित नाही.

Goa GMC Road
GMC: कोविडकाळी ‘फ्रन्टलाइन’ला लढणाऱ्या योद्ध्यांचे कार्य गैरसोयीच्या तक्रारी करताना स्मरत नाही; जीएमसी, सेवाभावाचा अखंड स्रोत

सर्व प्रकारच संशयास्पद

काही दिवसांपूर्वी या वाहतुकीसंदर्भात पोलिसांना तक्रारी आल्या मात्र बांबोळी पोलिस चौकीच्या पोलिसांचेच या फास्टफूड धारकांशी साटेलोटे असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी फक्त समज दिली जाते. या मोबाईल फास्टफूड वाहनांना तेथे वाहने उभी करून व्यापार करण्यास कोणतेचे परवाने नाहीत तरी कारवाई केली जात नाही. पोलिस नियंत्रण कक्षाचे वाहनही वेळेवर पोहचत नाही, त्यामुळे हा सर्व प्रकारच संशयास्पद आहे.

Goa GMC Road
GMC Goa: "लोकांच्या मरणावर 'दुकानदारी' खपवून घेणार नाही!" माफियांना आरोग्यमंत्र्यांचा कठोर इशारा; पाहा व्हिडीओ

विक्रेत्यांवर कारवाई का नाही?

या परिसरात अनेक शहाळे विक्रेते आहेत, मात्र या शहाळ्यांचा कचरा एका पिशवीत साठवून तो दूर ठिकाणी टाकण्याऐवजी तेथील अंतर्गत रस्‍त्याच्या बाजूनेच टाकण्यात आला आहे. पंचायतीला हे माहीत असूनही त्याकडे डोळेझाक करत आहे. हे विक्रेते सांताक्रुझ व कुडका या भागातीलच असल्याने त्यांचे पंचायत सदस्यांशी लागेबांधे आहेत. सांताक्रुझ पंचायत कचरा रस्त्याच्या बाजूने फेकणाऱ्यांना ५ हजारांचा दंड ठोठावते तर या विक्रेत्यांवर का कारवाई करत नाही? असा प्रश्‍न नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com