GMC Goa: "लोकांच्या मरणावर 'दुकानदारी' खपवून घेणार नाही!" माफियांना आरोग्यमंत्र्यांचा कठोर इशारा; पाहा व्हिडीओ

Health Minister Goa: आरोग्यमंत्र्यांनी शववाहिकेच्या गैरवापर करून स्थानिकांकडून हजारो रुपये लुबाडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे
Vishwajeet Rane Goa
Vishwajeet Rane GoaDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: कुडचडे येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात रविवारी (दि. २ मार्च) मेगा वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या मेगा वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे, स्थानिक आमदार नीलेश काब्राल, डीन डॉ शिवानंद बांदेकर आणि वैद्यकीय प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी शववाहिकेच्या गैरवापर करून स्थानिकांकडून हजारो रुपये लुबाडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे.

पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की लोकांकडून मृतदेह नेण्यासाठी भरपूर शुल्क आकारणाऱ्या जीएमसी मधील खाजगी शववाहिकांवर कारवाई केली जाणार आहे. लोकांच्या मृत्यूवर जर पैसे कमावण्याचा प्रयत्न करणार असतील तर मी आरोग्यमंत्री असेपर्यंत अशा चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिलाय.

Vishwajeet Rane Goa
Goa Health News: ये विश्वजीत राणे का स्टाइल है! आरोग्यमंत्री Action Mode मध्ये; तीन कर्माचाऱ्यांना केले निलंबित

गोव्यात १०८ गाडीच शववाहनांचं काम करते मात्र याशिवाय पैशांसाठी काही खासगी लोकांकडून सुरु असलेला हा व्यवसाय बंद करण्यासाठी माझं काम सुरु आहे अशी माहिती देखील त्यांनी याच दरम्यान दिली.

गोव्यातील सामान्य जनतेला लुबाडण्याचा हा प्रयत्न आणखीन खपवून घेतला जाणार नाही. वीस हजार, पंचवीस हजार पैसे घेऊन जर का लोकांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री म्हणालेत.

एखादा माणसाचा जवळचा माणूस मृत्यू पावलेला असताना माणुसकी न दाखवता चालेला हा व्यवहार लवकरच बंद केला जाईल, अशा लोकांना तर थेट कैद केली पाहिजे असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला. गोव्यात भाजप सरकार असेपर्यंत आणि वाळपईचे आमदार विश्वजीत राणे आरोग्यमंत्री असेपर्यंत असे व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com