Bainguinim Waste Plant: "प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राजेश असणार का हे मी सांगू शकत नाही" मॉन्सेरात असं का म्हणाले?

Minister Babush Monserrate VS MLA Rajesh Faldessai: बायंगिणी प्रकल्प वादावर आता पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मौन तोडले आहे
Babush Monserrate, Ashok Phaldesai
Babush Monserrate, Ashok Phaldesai Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प होणारच, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केले असता कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आणि हिंमत असेल तर मंत्री मोन्सेरात यांनी हा प्रकल्प बायंगिणी येथे उभा करून दाखवावा, असे रोखठोक आव्हान त्यांनी दिले आहे. या वादावर आता पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मौन तोडले आहे.

बाबूश मोन्सेरात यांच्या मतानुसार मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या बैठकीत बायंगिणी कचरा प्रकल्पाविषयी चर्चा करण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेक लोकांनी या प्रकरणाला धरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता, मात्र न्यायालयाचीच या प्रकल्पाला संमती आहे, कारण या प्रकल्पामुळे जनतेला फायदाच होईल, त्यामुळे त्यांना कोणीही वैयक्तिकरित्या यामध्ये खेचू नये.

Babush Monserrate, Ashok Phaldesai
Bainguinim Waste Plant: 'हिंमत असेल तर प्रकल्प उभारुन दाखवाच'; बायंगिणीतील कचरा प्रकल्पावरुन मोन्सेरात-फळदेसाई पुन्हा आमने-सामने

पुढे आमदार राजेश फळदेसाई यांना उद्देशून धरत मोन्सेरात म्हणाले की, "आज प्रकल्पाच्या पायाभरणीच्यावेळी ते नक्कीच उपस्थित आहेत, मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ते असतील की नाही हे मी सांगू शकत नाही".

प्रकल्पाला फळदेसाईंचा विरोध

आमदार राजेश फळदेसाई यांनी त्यांना ‘हिंमत असेल तर हा प्रकल्प उभा करूनच दाखवा’ असे आव्हान दिले आहे. कचरा प्रकल्पाला माझा विरोध नाही. मात्र, तो बायंगिणी येथे नको; कारण त्याच्या सभोवती लोकवस्ती आहे. त्यामुळे माझा त्याला ठाम विरोध आहे. आजची ही बैठक मंत्रिमंडळाची होती. त्यामुळे मी तेथे नव्हतो. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत जेव्हा मला प्रकल्पासंदर्भात विचार मांडण्यासाठी बोलावतील, तेव्हा लोकांचे मत मांडून मी त्याला विरोध करणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com