.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी: बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प होणारच, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी (15 जानेवारी) स्पष्ट केले असता कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. हिंमत असेल तर मंत्री मोन्सेरात यांनी हा प्रकल्प बायंगिणी येथे उभा करून दाखवावा, असे रोखठोक आव्हान त्यांनी दिले आहे. या प्रकल्पावरून पुन्हा सत्ताधाऱ्यांमधील मंत्री - आमदारांमध्ये वादाची ठिणगी उडाली आहे. मात्र, बायंगिणी कचरा प्रकल्पाच्या या वादाबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले आहे. पत्रकारांनी वारंवार विचारणा करूनही त्यांनी केवळ स्मितहास्य करून नमस्कार करणे पसंत केले.
फळदेसाई यांचा या प्रकल्पाला विरोध असला तरी ठरल्यानुसार हा प्रकल्प त्याच ठिकाणी होणार, असा ठाम निर्धार मंत्री मोन्सेरात यांनी केला आहे. त्यामुळे याप्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr Pramod Sawant) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी आज गोवा कचरा व्यवस्थापन मंडळाची बैठक घेतली, त्याला मंत्री बाबूश मोन्सेरात उपस्थित होते. या बैठकीनंतर बायंगिणी कचरा प्रकल्पाविषयी विचारले असता ते म्हणाले की, ही बैठक राज्यातील विविध कचरा व्यवस्थापन प्रकल्पांसंदर्भात होती. बायंगिणीतील प्रकल्पासाठी येत्या तीन महिन्यांत नव्याने प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
१ फेब्रुवारीपूर्वी या प्रकल्पासाठी निविदा मागविण्यात येतील. या प्रकल्पाला स्थानिकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने (Court) या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले असता, तेथेही विरोध मोडून प्रकल्पाला परवानगी दिली आहे. त्यानुसारच ही प्रक्रिया सुरू आहे, असे मोन्सेरात म्हणाले.
या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तीन वर्षांपूर्वी झाली होती. मात्र, त्यात काही अडथळे आल्याने विलंब झाला आहे. या तीन वर्षांच्या काळात बांधकामाचे दर वाढल्याने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. ही प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पाला स्थानिक आमदारांकडून विरोध होत असला तरी तो प्रकल्प कचरा समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
आमदार राजेश फळदेसाई यांनी त्यांना ‘हिंमत असेल तर हा प्रकल्प उभा करूनच दाखवा’ असे आव्हान दिले आहे. कचरा प्रकल्पाला माझा विरोध नाही. मात्र, तो बायंगिणी येथे नको; कारण त्याच्या सभोवती लोकवस्ती आहे. त्यामुळे माझा त्याला ठाम विरोध आहे. आजची ही बैठक मंत्रिमंडळाची होती. त्यामुळे मी तेथे नव्हतो. मात्र, मुख्यमंत्री डॉ. सावंत जेव्हा मला प्रकल्पासंदर्भात विचार मांडण्यासाठी बोलावतील, तेव्हा लोकांचे मत मांडून मी त्याला विरोध करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.