Baga Beach: 'एका रात्रीचे किती घेतेस'? बागा बीचवर मुंबईच्या महिला पर्यटकाचा छळ; संशयितास सशर्त जामीन मंजूर

Baga Beach Crime News: : बागा समुद्रावर महिला पर्यटकाचा छळ केल्याप्रकरणी अटक झालेल्या संशयितास म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Mumbai woman tourist case baga
Mumbai woman tourist case bagaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बागा समुद्रावर महिला पर्यटकाचा छळ केल्याप्रकरणी अटक झालेल्या संशयितास म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका महिलेने १३ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती.

२४ ऑक्टोबर रोजी रात्री २.०४ ते २.४० सुमारास बागा समुद्रावर एका अनोळखी व्यक्तीने अश्लील वर्तन केले, “प्रति रात्र किती दर घेतेस” यासारखे अपमानास्पद प्रश्न विचारले आणि पाठलाग केला, असा आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे.

Mumbai woman tourist case baga
Crime News: गर्लफ्रेंडनं मोडलं 'वचन'! खर्च करणारा प्रियकर बनला खुनी; दुसऱ्याशी लग्न ठरल्यानं थेट घरात घुसून झाडली गोळी

कळंगुट पोलिसांनी दाखल करून घेतलेल्या तक्रारीद्वारे १५ नोव्हेंबर रोजी संशयिताला अटक केली होती. संशयित गोव्यातील कायम रहिवासी नसल्याने तो फरार होण्याची शक्यता तसेच साक्षीदारांना धमकावण्याचा धोका असल्याचा युक्तिवाद करून सरकारी वकिलांनी जामिनास विरोध केला.

Mumbai woman tourist case baga
Crime News: आईसोबत प्रियकराला बघितलं, त्याची सटकली, दोघांचीही गळा दाबून केली हत्या; मृतदेह पिकअपमधून नेले पोलिस ठाण्यात

तसेच या प्रकारामुळे गोव्याची प्रतिमा मलिन झाल्याचेही न्यायालयास त्यांनी सांगितले. मात्र, न्यायाधीश अंकिता नागवेकर यांनी संशयितांविरुद्ध पूर्वी कोणतीही गुन्हेगारी नोंद नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच गोव्यातील मूळ रहिवासी नसणे हा जामीन नाकारण्याचा वैध आधार ठरू शकत नाही, असे स्पष्ट नमूद केले. तक्रार दाखल करण्यात साधारण २१ दिवसांचा विलंब झाला असला, तरी त्यातून आरोपांची तीव्रता कमी होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com