Crime News: गर्लफ्रेंडनं मोडलं 'वचन'! खर्च करणारा प्रियकर बनला खुनी; दुसऱ्याशी लग्न ठरल्यानं थेट घरात घुसून झाडली गोळी

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. येथील भोजपूर परिसरात एका तरुणाने आपल्या प्रेयसीला घरात घुसून गोळी घातली. सदर 22 वर्षीय तरुणीचे लग्न इतर ठिकाणी ठरले, ज्यामुळे तिचा प्रियकर प्रचंड संतापलेला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने प्रेयसीवर खूप खर्च केला होता. तिच्या घरी लावण्यात आलेल्या एअर कंडिशनरचा हप्ता देखील तो भरत होता.

पाच वर्षांपासून प्रेमसंबंध

मोदीनगरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अमित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी भोजपूर परिसरातील नांगलाबेर गावात घडली. 28 वर्षीय प्रदीप आणि पीडित तरुणीचे गेल्या सुमारे पाच वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र पीडित तरुणीचे लग्न कुटुंबीयांनी दुसऱ्या तरुणाशी ठरवल्याने आरोपी प्रदीप प्रचंड रागात होता. याच रागातून प्रदीपने थेट तरुणीच्या घरात प्रवेश केला आणि देशी बनावटीच्या पिस्तुलाने तिच्यावर गोळी झाडली. गोळी लागताच तरुणी जमिनीवर कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने मोदीनगरजवळील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन तिला पुढील उपचारांसाठी मेरठ येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

Crime News
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

गोळी डोक्यात अडकली

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी तरुणीच्या कानाजवळ डोक्याच्या वरच्या भागात अजूनही अडकलेली आहे. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पोलिसांनी सांगितले की, एमएससी प्रथम वर्षात शिकणाऱ्या पीडित तरुणीने अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये प्रदीपशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते. तिचे लग्न (Marriage) दुसऱ्या व्यक्तीसोबत ठरल्यामुळे आरोपी खूप अस्वस्थ होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी प्रदीपने तरुणीवर मोठी रक्कम खर्च केली होती. एवढेच नाहीतर, तिच्या घरात लावलेल्या एअर कंडिशनरचा हप्ता देखील तो नियमितपणे भरत होता, ज्यामुळे तो अधिक अपमानित आणि संतापलेला होता.

Crime News
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

आरोपी प्रदीपचा शोध सुरु

एसीपी अमित सक्सेना यांनी पुढे सांगितले की, "तरुणीच्या लग्नाबद्दल कळाल्यानंतर प्रदीपला आपल्या मित्रांमध्ये अपमानित झाल्यासारखे वाटले. याच रागातून तो तरुणीच्या घरी पोहोचला आणि तिच्यावर गोळी झाडली." पीडितेचा लहान भाऊ अंशुल याने याप्रकरणी पोलिसांत (Police) गुन्हा दाखल केला. पोलीस पथके आरोपी प्रदीपच्या संभाव्य ठिकाणांवर छापेमारी करत असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस लवकरच आरोपीला अटक करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com