Baga Beach: महिलांचे चोरुन व्हिडिओ काढायचा, लातूरच्या भामट्याला बेड्या; बागा समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांची कारवाई

Goa Beach: गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर महिला पर्यटकांचे त्यांच्या संमतीशिवाय चित्रीकरण करणाऱ्या एका पर्यटकाला मंगळवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले.
Latur youth arrested at Baga beach
Latur youth arrested at Baga beachDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवर महिला पर्यटकांचे त्यांच्या संमतीशिवाय चित्रीकरण करणाऱ्या एका पर्यटकाला मंगळवारी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. पर्यटन पोलीस पथक (TPU) आणि बीच मार्शलनी केलेल्या या कारवाईमुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या महिला पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. संशयित आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बीच मार्शलची सतर्कता

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बागा बीचवर पर्यटकांची वर्दळ असताना एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत होता. तो आपल्या मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करून समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या महिला पर्यटकांचे चोरून व्हिडिओ बनवत असल्याचे बीच मार्शलच्या लक्षात आले. मार्शलनी तातडीने पर्यटन पोलीस युनिटला (Tourist Police Unit) पाचारण केले आणि संशयिताला ताब्यात घेतले.

Latur youth arrested at Baga beach
Goa Crime: अबब! गोव्यात पकडले 5.91 कोटींचे ड्रग्ज; 5 विदेशींसह एकूण 27 जणांना अटक

आरोपी लातूरचा रहिवासी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव सय्यद जावेद नजीर (वय अंदाजे ३०-३५ वर्षे) असून तो महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे.

Latur youth arrested at Baga beach
Goa Waste Problem: 500 कोटीहून अधिक खर्च, समस्या मात्र तशीच! गोव्यात कचरा व्यवस्थापनाचे त्रांगडे सुटणार कसे?

कळंगुट पोलिसांत गुन्हा दाखल

पर्यटन पोलिसांनी आरोपीला कळंगुट पोलीस स्थानकात नेले असून, तिथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सध्या अधिक सतर्क झाले असून, पर्यटकांनीही असे प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com