World Homeopathy Day : राज्यात आयुष अंतर्गत लवकरच होमिओपॅथी, सिद्धा, युनानी संशोधन

मुख्यमंत्री प्रमोद सावंत : वेलनेस टुरिझमलाही चांगला वाव
CM Addressed the World Homeopathy Day program
CM Addressed the World Homeopathy Day program Dainik Gomantak
Published on
Updated on

World Homeopathy Day : राज्यात आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत होमिओपॅथी, युनानी, सिद्धाच्या उपचार पद्धती आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी, आरोग्य संचालनालय आणि आयुष सेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीच्या वेबसाइटचा शुभारंभ करण्यात आला.

CM Addressed the World Homeopathy Day program
Alcohol Death Statistics: सावधान! गोव्यात रस्ते अपघातातील मृत्युंपेक्षा जास्त मृत्यू मद्यपानामुळे; दरवर्षी तब्बल 'इतके' मृत्यू...

डॉ. सावंत म्हणाले, राज्यात वेलनेस टुरिझमला भरपूर वाव आहे. त्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा फायदा घ्यावा.

गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. बिपीन साळकर म्हणाले, होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 10 एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन पाळला जातो.

होमिओपॅथीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दुष्परिणाम नाहीत. याप्रसंगी डॉ. मीनल जोशी, डॉ. रुपा नाईक उपस्थित होते. डॉ. राजेंद्र काणेकर यांनी स्वागत तर डॉ. मर्लिन टेलीस यांनी आभार मानले. डॉ. प्रतिष्ठा कुंकळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

CM Addressed the World Homeopathy Day program
State Bank Theft : एटीएम समजून पळविले पासबूक प्रिंटिंग मशीन

मान्यवरांचा सन्मान

डॉ. नारायण शिरोडकर आणि डॉ. मालिनी देसाई यांचा होमिओपॅथी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ होमिओपॅथी म्हणून सत्कार करण्यात आला.

तर डॉ. सायेश मडकईकर आणि डॉ. अनुपा प्रभू यांना आगामी होमिओपॅथी पुरस्कारानेही गौरविण्यात आले. डॉ. शेखर शेट्ये, डॉ. विजयलक्ष्मी देसाई, डॉ. मर्लिन टेलीस, डॉ. स्वाती देसाई, डॉ. डॉमनिक डिसूझा, डॉ. पल्लवी काणेकर, डॉ. रीना परब, डॉ. श्वेता गांधी, डॉ. स्पंदन फळदेसाई यांचा आरोग्य केंद्रांमध्ये होमिओपॅथीच्या प्रचार प्रसारासाठी सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com