State Bank Theft : एटीएम समजून पळविले पासबूक प्रिंटिंग मशीन

चोरीची चर्चा : खांडेपारमधील स्टेट बँकेच्या शाखेतील प्रकार, फोंडा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
State Bank Theft
State Bank TheftGomantak Digital Team
Published on
Updated on

Ponda State Bank Theft : चोरी करायलाही अक्कल लागते, असे म्हणतात ते उगीच नाही. नाहीतर त्याचे परिणाम काय होतात, हे आज समोर आलेल्या घटनेवरून दिसून येते.

खांडेपार-फोंड्यातील स्टेट बँकेच्या शाखेत रविवारी मध्यरात्री चोरट्याने एटीएम मशीन समजून चक्क पासबूक प्रिंटिंग मशीनच पळविले.

चोरट्याने हे मशीन लगतच्या चौपदरी बगल रस्त्यावर फोडले, पण त्याला आतमध्ये काहीच सापडले नाही. खांडेपार येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एका छोट्या खोलीत एटीएम मशीन आणि प्रिंटिंग मशीन बसवलेले आहेत.

संबंधित चोरटा रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास या खोलीत शिरला. त्यावेळी त्याने चेहरा शर्टने पूर्णपणे झाकला होता.

State Bank Theft
Illegal Construction in Panaji: रस्त्यासाठी नुकसान भरपाई देऊनही सांतिनेज परिसरात अतिक्रमण!

आत शिरून त्याने एटीएम समजून प्रिंटिंग मशीन तोडले आणि सायकलवर लावून तेथून त्याने पलायन केले. चोरीचा हा प्रकार आज सोमवारी बँकेचे कर्मचारी सकाळी बँकेत आल्यानंतर समजला. लागलीच बँकेचे व्यवस्थापक रोहित विश्‍वकर्मा यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले.

यात वरील घटना स्पष्टपणे दिसली. विश्‍वकर्मा यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पंचनामा केल्यावर पोलिसांनी चोरट्याने या भागाची संपूर्ण पाहणी केली असावी, असा कयास व्यक्त केला.

चोरीपूर्वी केली बँकेची रेकी

बँकेच्या इमारतीतच एका छोट्या खोलीत हे एटीएम आणि पासबूक मशीन एकत्रित आहे. ग्राहकांना एटीएममधून पैसे काढता यावेत, म्हणून एटीएमची ही खोली चोवीस तास खुली असते.

दरम्यान, सुरक्षा रक्षक नसल्याचे चोरट्याने पाहिले असावे. त्यामुळे त्याने शांतपणे एटीएम समजून पासबूक मशीन उखडले आणि पळ काढला.

State Bank Theft
Health Review Meeting : वाढती कोरोना रुग्णसंख्या, G-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांनी घेतला आढावा

चोऱ्यांचे सत्र सुरूच ; भीती व्यक्त

तिस्क-उसगाव येथील दोन बँकांचे एटीएम मशीन पळवण्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी झाला होता. एका बँकेचे मशीन फोडण्यात चोरट्यांना यश आले होते.

दरम्यान, खांडेपार भागात एका घरातही दागिन्यांची मोठी चोरी झाली होती. रात्रीच्यावेळी या परिसरात गस्त घालण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

State Bank Theft
'मुख्यमंत्र्यांचा भाऊ, PA सांगणाऱ्या व्यक्तीला बळी पडू नका', मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मशीन अडकवले सायकलला

चोरट्याने प्रिंटिंग मशीन उचलून खोलीबाहेर आणले व रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या सायकलला अडकवले. तेथून त्याने सरळ चौपदरी बगल रस्ता गाठला.

हा चौपदरी रस्ता एका बाजूला बंद असल्याने चोरट्याने हे मशीन फोडले. पण आत काहीच न सापडल्याने त्याने फोडलेले मशीन तेथेच टाकून पळ काढला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com