Death Due to Alcoholism in Goa More than Drunk Driving Accident: गोव्यातील रस्ते अपघात ही एक मोठी समस्या आहे. रस्ते अपघातात दरवर्षी अनेक जीव जात असतात. पण एक धक्कादायक वास्तव म्हणजे, रस्ते अपघातांपेक्षाही जास्त मृत्यू गोव्यात मद्यपानामुळे झाल्याचे समोर आले आहे.
गोवा मेडिकल कॉलेज (GMC) च्या माहितीनुसार मद्यपानामुळे लिव्हर सिरोसिस होऊन 300 हून अधिक मृत्यू राज्यात दरवर्षी होतात. ही संख्या दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या संख्येपेक्षाही जास्त आहे.
गोवा मेडिकल कॉलेजच्या माहितीनुसार 2022 मध्ये मद्यपानामुळे झालेल्या यकृताच्या आजाराने 318 मृत्यू झाले होते, 2021 मध्ये 356 मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, गोव्यात गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये 271 रस्ते अपघात मृत्यूची नोंद झाली होती.
विशेष म्हणजे, GMC मध्ये दररोज मद्यपानाशी संबंधित आजाराची पाच ते सहा प्रकरणे दररोज येत असतात. दर महिन्याला जीएमसीमध्ये 5,500 रुग्णांना दाखल केले जाते. त्यापैकी 25 टक्के रुग्णांना मद्यपानाशी संबंधित समस्या असतात.
लिव्हर सिरॉसिस हा आजार पुर्वी काळात चाळीशी आणि पन्नाशीच्या मध्यात असलेल्या रुग्णांना व्हायचा. परंतु आता 20 व्या वर्षातही हा आजार दिसून येत आहे. कारण आजकाल, कमी वयातच मद्यपानाची सवय तरूणांना जडत आहे.
आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी हे रूग्ण उपचारासाठी येतात. पाच ते दहा वर्षे मद्यपान करत असलेल्यांना यकृताच्या समस्या आणि इतर आरोग्य समस्या भेडसावत असतात.
त्यातून स्वतःसह, कुटूंब आणि समाजाचेही नुकसान होत असते. हेच लोक मद्यपानाच्या नशेत गाडी चालवून अपघाताला कारणीभूत ठरत असतात.
गेल्या काही वर्षात मद्यपानामुळे झालेले मृत्यू
वर्ष मृत्यू
2022 -------- 318
2021 -------- 356
2020 -------- 325
2019 -------- 340
2018 -------- 336
2017 -------- 283
2016 -------- 281
2015--------- 261
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.