Vinayak Khedekar: पोर्तुगीज राजवटीतील गावांच्या नावाचं विकृतीकरण थांबवा

''गावाच्या नावाचे इंग्रजीतील स्पेलिंग स्थानिक भाषेतील उच्चारानुसार असले पाहिजे''
Author Vinayak Khedekar
Author Vinayak KhedekarDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा राज्यात बहुतांशी शहरांची नावे ही कोकणी, इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषांत वेगवेगळी आहेत. या संदर्भाने प्रख्यात लोकसाहित्यकार आणि लेखक विनायक खेडेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोर्तुगिज कालखंडात झालेलं गावांच्या नावाचं विकृतीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलावे यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

(Author Vinayak Khedekar requested to CM Pramod Sawant and to authenticate the names of goa state talukas and villages)

खेडेकर यांना 2021 मध्ये गोव्याच्या लोककलेतील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणाले की, गावांसह ठिकाणाचे नाव मातीशी, संस्कृतीशी थेट जोडलेले असते म्हणून भाषा कोणतीही असो. नावे ही त्यांच्या उच्चारानुसार लिहिली पाहिजेत. दुर्दैवाने पोर्तुगिज राजवटीत गोव्यातील अनेक शहर, ठिकाणांची नावे विकृत करण्यात आली आहेत. ती लवकरात लवकर दुरुस्त करणे आवश्यक आहे. असे ही ते म्हणाले.

Author Vinayak Khedekar
Goa dairy : गोवा डेअरी समस्यांच्या गर्तेत; नुकसानीचा आकडा सहा कोटींकडे

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाला उत्तर देताना म्हटले आहे की,राजभाषा संचालनालयामार्फत शासन कार्यवाही करेल, यासाठी संबंधित गावांनी या नावांच्या प्रमाणीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन यावर गांभिर्याने विचार करुन योग्य ती अंमलबजावणी करेल असे मुख्यमंत्र्यांनी खेडकर यांना आश्वासित केले आहे.

Author Vinayak Khedekar
Goa First's च्या पुढाकाराने मामलेदार राहुल देसाई गजाआड

खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोव्यातील अनेक गावांची नावे पोर्तुगीज भाषेत विकृत करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने करमाळी, कारंबोलीम, हडफडे, आरपोरा, क्यूपेम, मापुसा अशी उदाहरणे आहेत. यांना बदलण्यासाठी आपण सकारात्मकपणे पुढे यावे अशी ही विनंती त्यांनी केली.

खेडेकर म्हणाले की, गोवा मुक्तीच्या 60 वर्षानंतर गोव्यातील ठिकाणांची मूळ नावे वापरात यायला हवीत. “त्यांचे इंग्रजीतील स्पेलिंग स्थानिक भाषेतील त्यांच्या उच्चारानुसार असले पाहिजेत,” अशा प्रमाणीकृत नावांना पुढे सूचित केले जावे. यासाठी प्रशासनाने ही सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक असल्याचं खेडकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com