Goa First's च्या पुढाकाराने मामलेदार राहुल देसाई गजाआड

''मुरगावातील जमिन परस्पर विकण्यासाठी मामलेदार देसाई यांना येथे आणल्याची शक्यता'' - गोवा फर्स्ट
Goa First NGO
Goa First NGODainik Gomantak

वास्को: मुरगाव तालुक्यातील बिगर सरकारी संस्था 'गोवा फर्स्ट' च्या तक्रारीमुळे अखेर मुरगाव तालुक्यातील मामलेदार कार्यालयातील भ्रष्ट संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांना विशेष तपास यंत्रणेने अटक केली. राहुल देसाई याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

(Goa First's initiative help SIT to arrest mamledar Rahul Desai )

मुरगाव तालुक्यातील 2 व 3 संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमिन बळकवल्याच्या आरोपाखाली विशेष तपास यंगणेने यापूर्वीच जबानी नोंदविण्यात आली होती. संयुक्त मामलेदार देसाई यांच्यावर बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळ्यातील 20 पेक्षा जास्त तक्रारी म्हापसा पोलिसात नोंद झाल्या होत्या. नंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जमिन घोटाळ्याचे तपासकार्य पणजी येथील विशेष तपास यंत्रणेकडे सुपूर्द केली.

पुढे एसआएटी तर्फे जमिन घोटाळा प्रकरणी तपास करण्यास सुरुवात करताच प्रथमदर्शनी बार्देश तालुक्यातील संयुक्त मामलेदार राहुल देसाई व इतर पाचजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले. नंतर एसआयटी तर्फे संयुक्त मामलेदार राहुल देसाई याला जबानीसाठी एसआएटी कार्यालयात बोलाविण्यात आले. जमिन बळकावल्या प्रकरणी एसआयटीला आणखीन ठोस पुरावे मिळताच त्याच्या तपास कार्याला गती मिळाली.

दरम्यान बार्देश तालुक्यातील जमिन घोटाळा प्रकरणी विशेष तपास यंत्रणेच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांची राज्य सरकार तर्फे मुरगाव तालुक्यातील मामलेदार कार्यालयात 2 व 3 संयुक्त मामलेदार म्हणून नियुक्ती केली. सदर बार्देश तालुक्यात जमिन बळकावल्याप्रकरणी संशयीत आरोपी संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांनी मुरगाव तालुक्यातील मामलेदार कार्यालयात संयुक्त मामलेदारपदाची सुत्रे हातात घेतली.

Goa First NGO
Land Grabbing Case: मामलेदार राहूल देसाईसह मैथी, वझरकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुरगावचे संयुक्त मामलेदार देसाई हे जमिन घोटाळ्यात संशयीत आरोपी असल्याची माहिती 'गोवा फर्स्ट ' बिगर सरकारी संस्थेला मिळताच, त्याच्या नियुक्तीला गोवा फर्स्टचे सर्वेसर्वा परशुराम सोनुर्लेकर यांनी आक्षेप घेतला. मुरगाव तालुक्यातील कोमुनिदाद जमिनी परस्पर विकण्यासाठी कदाचित एखाद्या मुरगाव तालुक्यातील राजकारणाने मामलेदार देसाई यांना येथे आणले असावा, असा संशय सोनुर्लेकर यांनी व्यक्त केला होता.

Goa First NGO
Illegal stone Quarry : सांगेतील खाणीवर छापेमारी; नगरसेवकाचे धाबे दणाणले

गोवा फर्स्ट तर्फे संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्या विरोधात राज्याचे मुख्य सचिव, राज्य महसुल विभाग आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. अखेर गोवा फर्स्टच्या तक्रारीने मुरगावचे संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांना विशेष तपास यंत्रणेने जबानीसाठी बोलावून रात्री अटक केली. शुक्रवार(दि.30) सायंकाळी संयुक्त मामलेदार राहुल देसाई याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गोवा फर्स्टचे निमंत्रक परशुराम सोनुर्लेकर यांने मुरगावातून संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांची त्वरीत बदली करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. अखेर विशेष तपास यत्रणेने राहुल देसाई याला अटक केल्याने गोवा फर्स्टचे सोनुर्लेकर यांनी एसआयटीचे आभार मानले. तसेच मुरगाव तालुक्यातील पत्रकारांनी घोटाळेबाज संयुक्त मामलेदार राहुल देसाई यांच्या विरोधात आपल्या वृत्त पत्रात निर्भिडपणे लिहील्याबद्ल सोनुर्लेकर यांनी विशेष करून दैनिक ' गोमन्तक ' चे आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com