'औ' म्हणजे औरंगजेब! कोकणी अंकलिपीतील उल्लेखामुळे गोव्यात नवा वाद

भाषेची बदनामी करणाऱ्या नागरिकांना चोप देणे गरजेचे : सुभाष वेलिंगकर
subhash velingkar Posted Ankalipi Photo On Social Media
subhash velingkar Posted Ankalipi Photo On Social MediaDainik Gomantak
Published on
Updated on

Subhash velingkar : कोकणी अंकलिपी (उजळणी) पुस्तकात औ वरून औरंगजेब उल्लेख असलेली अंकलिपी विद्यार्थ्यांना उजळणीसाठी देण्यात येत असल्याच्या माहितीतून राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी या मानसिक विकृतीचा निषेध केला असून आपण आपल्या मुलांना आपले शत्रू कोण? आपले आदर्श कोण? हे सांगण्यास देखील चुकत आहोत यासारखे दुर्देव नसल्याचे म्हटले. अशा प्रकारे भाषेची बदनामी करणाऱ्या नागरिकांना चोप देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

subhash velingkar Posted Ankalipi Photo On Social Media
मातृभाषेच्‍या रक्षणासाठी प्रसंगी आंदोलनाला सज्ज व्‍हा : प्रा. सुभाष वेलिंगकर

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी सांगितले की, "गोव्यात अशा प्रकारची अंकलिपी कोण वापरत आहे हे अजून समजले नसून तसेच ही कोणी प्रकाशित केली, त्याचे प्रकाशक कोण हे समजलेले नाही."

"अशा प्रकारच्या अंकलिपी राज्यातील कोणत्या तालुक्यात आहेत तसेच त्या अंकलिपीच्या प्रकाशकाचा शोध आम्ही घेत असून निश्‍चितपणे अशा प्रकारचे काही आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार" असल्याचे त्यांनी सांगितले.

subhash velingkar Posted Ankalipi Photo On Social Media
गोवावासियांना स्वातंत्र्यसैनिकांचे दस्ताऐवज पाहण्याची संधी; पुराभिलेख सप्ताह प्रदर्शनाचे आयोजन

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने व अहमदनगर या ठिकाणी औरंगजेबाचे फोटो नाचवले गेल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. 

शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी 6 जून रोजी काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर ते स्टेटस व्हायरल झाले आणि तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आणली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Subhash Phaldesai Delhi Meeting
Teachers role in shaping new generation
Subhash Phal Dessai Curchorem visit
 NET Qualified Candidate Denied Admission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com