गोवा निवडणूक प्रचारादरम्यान TMC नेते बाबुल सुप्रियो यांच्यावर हल्ला?

गोव्यात स्थानिक पक्षाच्या गुंडांनी हल्ला केल्याचा बाबुल सुप्रियो यांचा दावा
Babul Supriyo
Babul SupriyoDainik Gomantak
Published on
Updated on

GOA Election: सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी टीएमसी (TMC) नेते बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) गोव्यात (Goa Election 2022) आले आहेत यावेळी प्रचारादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला. 'गोव्यात स्थानिक पक्षाच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ते थोडक्यात बचावले. ज्याने आपल्यावर हल्ला केला तो दोन राष्ट्रीय पक्षांच्या युतीने गोव्यात निवडणूक लढवत आहे. लोकविरोधी हेतूने माझ्यावर हल्ला करण्यात आला. पण माझे PSO आणि मी त्याचे आक्रमक प्रयत्न टाळत राहिलो,' असे बाबुल सुप्रियो यांनी नाव न घेता म्हटले आहे. गोव्याच्या 40 विधानसभेच्या जागेसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 10 मार्चला निकाल लागणार आहे.

'लोकांना आवाहन करणे हा आमचा अधिकार आहे, याप्रकरणी आम्ही एफआयआर दाखल केलेला नाही. आम्ही येथे धमकावण्यासाठी किंवा धमक्या एकून घेण्यासाठी आलेलो नाही, त्यापेक्षा लोकांना आम्हाला मत मागणे हा आमचा अधिकार आहे,' हल्ल्याच्या वेळी पोलीस उपस्थित आल्याचेही बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.

Babul Supriyo
पुढील 5 दिवसात भाजपच्‍या 12 सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्‍हापशात
Babul Supriyo tweet
Babul Supriyo tweetTwitter

मोदी सरकारमध्ये बेरोजगारी शिगेला पोहोचली

मोदी सरकारमध्ये बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. घट्ट मिटलेल्या डोळ्यांनी हसतमुखाने अनेक 'भक्त' ट्विटरवर निष्क्रिय बसले आहेत. लवकर बरे व्हा मित्रांनो आणि नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा, असे बाबुल सुप्रियो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com