पुढील 5 दिवसात भाजपच्‍या 12 सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी म्‍हापशात

प्रचारासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असल्‍याने त्‍या दिवसांत केंद्रीय नेत्‍यांच्‍या जाहीर सभा होणार आहेत
 Prime Minister Narendra Modi Mapusa
Prime Minister Narendra Modi MapusaDainiki Gomantak 
Published on
Updated on

पणजी : विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर भाजपने आपला प्रचार आक्रमक केला असून, पुढील पाचही दिवसांत केंद्रीय मंत्र्यांच्‍या बारापेक्षा जास्‍त जाहीर सभा व घरोघरी प्रचार करण्‍यावर भर दिला जाणार आहे. शुक्रवार दि. 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची म्‍हापसा येथील श्री बोडगेश्‍‍वर देवस्‍थानच्‍या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्‍यात आल्‍याची माहिती प्रदेशाध्‍यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी उपस्‍थित होते.

यावेळी पुढे बोलताना तानावडे म्‍हणाले की, राज्‍यातील सर्व मतदारसंघांत भाजपचा (BJP) प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असल्‍याने त्‍या दिवसांत केंद्रीय नेत्‍यांच्‍या जाहीर सभा होणार आहेत.

 Prime Minister Narendra Modi Mapusa
राज्य सरकारकडून मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

उद्या मंगळवार दि. 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय भूपृष्‍ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्‍या पेडणे, थिवी, शिवोली येथे जाहीर सभा होणार आहेत. तर, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जे. पी. नड्डा यांच्‍या फातोर्डा आणि नावेली येथे जाहीर सभा होत आहेत. 9 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा मये, डिचोली आणि साखळी येथे होणार आहे. तर, याच दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्‍या जाहीर सभा फोंडा व वास्‍को येथे होणार आहेत. गुरुवार दि. 10 रोजी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, रेल्‍वे राज्‍यमंत्री दर्शना जरदोश तर गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्‍याही जाहीर सभा ठिकठिकाणी होणार आहेत.

मुंगेरीलाल के हजार सपने!

बाणावली (Benaulim) मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे (TMC) उमेदवार तथा माजी मुख्‍यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल 18 पेक्षा जास्‍त जागा जिंकणार असल्‍याचे जाहीर केल्‍यावर आपली प्रतिक्रिया व्‍यक्त करताना तानावडे म्‍हणाले ‘मुंगेरीलाल के हजार सपने’ बाळगून तृणमूल काँग्रेस गोव्‍यातील निवडणुकीत उतरला आहे. आणि त्‍यांची ही स्‍वप्‍ने कधीही सत्‍यात उतरणार नाहीत. सध्‍या ते गाढ झोपेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com