पणजी: साळगावातील ‘आप’च्या रोजगार यात्रेत सांगोल्ड्याचे सरपंच उल्हास मोरजकर यांनी त्यांच्या समर्थकांसह यात्रेवर आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला केला. प्रसार माध्यमे आप नेते आणि टॅक्सी युनियनचे नेते चेतन कामत आणि विधानसभा प्रभारी संदीप पेडणेकर यांची प्रतिक्रिया घेत असताना हा प्रकार घडला.
रोजगार यात्रा सुरू होण्याच्या ठिकाणी मोरजकर यांनी व त्यांच्या समर्थकांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना दमदाटी करण्यास सुरवात केली. मोरजकर समर्थकांनी देखील त्यांना धमक्या देण्यास सुरवात केली. यावेळी आप स्वयंसेवक खंबीरपणे उभे राहिले. स्वयंसेवकांनी आणि प्रसारमाध्यमांनी एकजूट दाखवल्यानंतर सरपंचांना पसार व्हावे लागले.
रोजगार यात्रेदरम्यान आप दररोज 75 बुथस्तरीय सभा घेत असून आज मडगाव, फातोर्डा आणि सालीगाव येथे 3 सभा घेतल्या. संपूर्ण गोव्यामध्ये आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि सत्ताधारी आमदार घाबरले आहेत हे स्पष्ट होत आहे, अशी प्रतिक्रिया आपने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सरपंचाची वागणूक निषेधार्ह आहे. त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मीडियाला धमकावले. हे वर्तन लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. हा रोजगार यात्रा थांबवण्याचा प्रयत्न होता. त्यांना भीती आहे की ते अपयशी ठरले आहेत. कोणीही आडवे आले तरी रोजगार यात्रा थांबणार नाहीत, कारण आपला जनतेचा पाठिंबा आहे.
- चेतन कामत, आप नेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.