Prashasan Tumchya Daari : ...तर कचरा प्रकल्पासाठी कोमुनिदादची जागा : मोन्सेरात

तिस्क-फोंड्यातील उपजिल्हाधिकारी संकुलात ‘प्रशासन तुमच्या दारी’ कार्यक्रम आयोजित
Atanasio Monserrate In in Ponda Taluka
Atanasio Monserrate In in Ponda TalukaDainik Gomantak
Published on
Updated on

कचरा समस्येचे निराकारण करण्यासाठी प्रत्येक पंचायतक्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित पंचायतींना सरकारकडून आवश्‍यक सहकार्य केले जाईल आणि ज्या पंचायतींकडे स्वतःची जमीन नाही.

त्यांना कोमुनिदादची जमीन अशा प्रकल्प उभारणीसाठी देण्यात येईल, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी (शुक्रवारी) फोंड्यात ‘प्रशासन तुमच्या दारी’ या उपक्रमावेळी पंचायतींच्या सरपंच व पंचसदस्यांना सांगितले.

Atanasio Monserrate In in Ponda Taluka
Shrigao : शिरगावात लोकवस्तीजवळच खनिज डंपमधून एकाएकी आगीच्या ज्वाळा!

तिस्क - फोंड्यातील उपजिल्हाधिकारी संकुलात हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासोबत फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक इतर नगरसेवक, ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातच ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रे तसेच कृषिकार्डाचे वितरण मोन्सेरात यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सरकारचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडे अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांबाबत आवश्‍यक कृतीचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. फोंडा तालुक्यातील अनेक पंचायतींच्या सरपंच व पंचसदस्यांनी कचरा समस्या तसेच प्रकल्प उभारणी व अन्य समस्यांंसंंबंधी आपली गाऱ्हाणी मांडली.

Atanasio Monserrate In in Ponda Taluka
Cashew Festival : पणजीत होणार पहिला काजू महोत्सव : डॉ. दिव्या राणे

ज्येष्ठांची जागेअभावी परवड

वास्तविक ‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम आयोजित करताना नियोजन करण्याची गरज होती, पण तसे न करता सरकारी संकुलात अडचणीच्या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवला गेला. त्यामुळे खेटाखेटीचे स्वरुप या कार्यक्रमाला लाभले. या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांची परवड झाली.

वास्तविक हा कार्यक्रम प्रशस्त, अशा जागी आयोजित करता आला असता, विशेषतः फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात हा कार्यक्रम आयोजित केला असता तर योग्य ठरले असते, असे लोकच बोलत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com