Shrigao : शिरगावात लोकवस्तीजवळच खनिज डंपमधून एकाएकी आगीच्या ज्वाळा!

गूढ कायम : लोकवस्तीजवळ घडला प्रकार; परिसरात भीतीचे सावट
fire from the mineral dump
fire from the mineral dumpDainik Gomantak
Published on
Updated on

तुकाराम सावंत

राज्यातील आगीचा वणवा शांत होत असतानाच, डिचोली तालुक्यातील शिरगाव गावात लोकवस्तीजवळच खनिज डंपमधून आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडत असल्याचे आढळून येत आहे. या प्रकारामुळे शिरगावात खळबळ माजली असून, लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.

गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून हा प्रकार चालू असून, खनिज डंपमधून आगीच्या ज्वाळा आणि धूर नेमका कशामुळे बाहेर पडत आहे. त्याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

fire from the mineral dump
E-Rickshaw In Goa : दिव्यांगांच्या सुविधेसाठी विकत घेणार चार ई-रिक्षा : गुरुप्रसाद पावस्कर

तूर्तास हा अजब प्रकार म्हणजे शिरगाववासीयांसाठी चिंतेचा विषय ठरला असून, सध्या गावातील लोक भीतीच्या सावटाखाली आहेत. डंपमधून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळांमुळे उद्रेक होऊन भविष्यात गावात भूकंपाचा हादरा तर बसणार नाही ना? अशी भीतीही लोकांमध्ये निर्माण होत आहे.

शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर पंचायत कार्यालयाच्या मागच्या बाजूने लोकवस्तीपासून जवळच खनिज डंप पेटत आहे. चौगुले कंपनीच्या खाण खंदकाला लागून मोठ्या प्रमाणात खनिज डंप आहे. हा खनिज डंप तीस वर्षांपूर्वीचा आहे, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

fire from the mineral dump
Karan Johar Emotional Post :"कधीही ढोंग करू नकोस" आईने शिकवले... करण जोहरने लिहिली भावनिक पोस्ट

उग्र दर्पाचा त्रास

खनिज डंप आतून पेटत असून, अधूनमधून आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडत आहे. डंप पेटू लागला की, एक वेगळाच रासायनिक पदार्थ जळल्यासारखा उग्र दर्प निर्माण होत असून, हवेतून हा दर्प गावात पसरत आहे. त्यामुळे आरोग्याचा त्रास जाणवत आहे, अशी लोकांची तक्रार आहे.

"खनिज डंपमधून आगीच्या ज्वाळा नेमक्या कोणत्या कारणांमुळे बाहेर पडतात. त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. धूर बाहेर सुटला, की उग्र वास पसरतो. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खाण खात्याने या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन गावातील लोकांचे रक्षण करावे."

- बाबूसो गावकर, माजी सरपंच, शिरगाव

गोवा प्रदूषण मंडळ तसेच खाण आणि भूगर्भ खात्याच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात या पेटत्या डंपची पाहणी करून नमुने गोळा केले आहेत. मात्र, संबंधितांनी अजूनही या अजब प्रकाराचा उलगडा केलेला नाही. त्यामुळे लोकांमधील भीती वाढत आहे. संबंधितांनी याप्रकरणी संशोधन करावे.

- सूर्यकांत पाळणी, पंच, शिरगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com