Cashew Festival : पणजीत होणार पहिला काजू महोत्सव : डॉ. दिव्या राणे

विविध उपक्रमांच्या माध्यमातून 15 व 16 एप्रिल रोजी आयोजन
Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रदेशनिष्ठतेच्या आधारावर ‘जीआय’ मानांकन मिळवणारा काजू राज्यासाठी वरदान ठरणार आहे. यासाठीच वन खाते आणि वन विकास महामंडळ यांच्यावतीने 15 आणि 16 एप्रिल रोजी पणजीच्या दयानंद बांदोडकर मैदानावर पहिल्या काजू महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी जाहीर केले.

या महोत्सवाचा लोगो वनमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. यावेळी मुख्य प्रधान वनसंरक्षक राजीव गुप्ता व व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार उपस्थित होते.

Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Panaji News : होर्डिंग्सविरोधातील कारवाईत चालढकलपणा

व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार म्हणाले, महोत्सवादरम्यान कार्यशाळा, व्याख्याने आणि काजूपासून बनवलेल्या वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच काजू फेणी बनविण्याची समृद्ध परंपरा आणि काजूने आपल्या वारशात कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे दाखविले जाईल.

मुख्य वनसंरक्षक राजीवकुमार गुप्ता यांनी गोव्यातील काजूचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे आणि त्या दिशेने महामंडळ प्रयत्नशील आहे. देशात काजू उत्पादनाच्या सातव्या यादीत गोवा येतो आणि राज्यात विकला जाणारा 25 ते 50 टक्के काजू आयात केला जात असल्याचे सांगितले. यावेळी गोवा वन विकास महामंडळातर्फे गोव्यातील काजू परंपरा विशद करणारा माहितीपट दाखविण्‍यात आला.

Curtain Raiser ceremony of Cashew Fest 2023
Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींचा मुंबईत भरणार दरबार; अंनिस अन् कॉंग्रेसने दर्शवला विरोध

"गोव्यातील काजू वारसा पुढे आणण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी काजू व्यवसायासंबंधी समस्या आणि उपयांवर चर्चा करण्यात येईल. गोव्याची फेणी जगासमोर नेऊन तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा या महोत्सवाचा हेतू आहे. महोत्सवादरम्यान लोकांना काजूच्या विविध पैलूंबद्दल, पौष्टिक आणि औषधी मूल्यांबद्दलदेखील माहिती मिळेल."

- डॉ. दिव्या राणे, अध्यक्ष, वन विकास महामंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com