Porvorim Elevated Road: अटल सेतूवरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग अखेर खुला! मडगाव, वास्को, फोंडा, बांबोळीहून उत्तर गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलांमुळे पणजीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची गर्दी वाढत होती.
Porvorim Elevated Road
Porvorim Elevated RoadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शहरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने मेरशी चौकातून अटल सेतूचा वापर करून पर्वरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना आजपासून पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिकसमोर सेवा रस्त्यावर उतरण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्यामुळे मडगाव, वास्को, बांबोळी, फोंडा, माशेल, जुने गोवे आदी भागांतून पर्वरी, कळंगुट, बागा, वागातोर तसेच परिसरातील भागांकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या सूचनेनुसार, दुचाकी वगळता अन्य वाहनांना मेरशीच्या दिशेने अटल सेतूचा वापर करून पर्वरीकडे जाता येणार आहे. ही वाहने पर्वरी उन्नत मार्गाच्या प्रवेशस्थळापूर्वी हॉटेल निओ मॅजेस्टिकजवळ अटल सेतूवरून खाली उतरतील. त्यानंतर सेवा रस्त्याचा वापर करून त्यांना पुढील प्रवास करता येईल.

Porvorim Elevated Road
Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

पर्वरी उन्नत मार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलांमुळे पणजीकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची गर्दी वाढत होती. अटल सेतूवरून येणाऱ्या काही वाहनांना पर्वरीत खाली उतरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढे जाऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत होता. परिणामी मेरशी, पणजी तसेच मांडवी पुलाच्या परिसरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत होता.

मॅजेस्टिकजवळ अटल सेतूवरून खाली उतरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने दक्षिण गोवा तसेच फोंडा, जुने गोवे आदी भागांतून उत्तर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पणजी शहरातून जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. त्यामुळे पणजीतील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अटल सेतूवरून सेवा रस्त्यावर उतरताना वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. सेवा रस्त्यावर प्रवेश करताना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

Porvorim Elevated Road
Goa Politics: 'ते' चॅटिंग मोठ्या स्क्रीनवर दाखवणार! विरोधकांच्या आरोपांना नगरनियोजनमंत्री राणेंचा इशारा; म्हणाले, "योग्य वेळी जनतेसमोर आणू"

दुचाकींना परवानगी नाहीच

अटल सेतूवरून पर्वरीच्या दिशेने जाण्याची ही सुविधा सध्या दुचाकी वगळता अन्य वाहनांसाठी आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी मांडवी नदीवरील नव्या-जुन्या पुलावरील मार्गांचा वापर करताना लागू असलेल्या वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim elevated road traffic
Porvorim Elevated Road
Porvorim Elevated Road Traffic Management
Porvorim Elevated Road Inspection
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com