Year End 2022 : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी गोवा एक पाऊल पुढे

गोवा सरकार देखील पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी नवनवीन सोयीसुविधा पुरवत आहे.
Year End 2022
Year End 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

देश पातळीवर गोव्याकडे 'पर्यटनदृष्ट्या विकसित राज्य' म्हणून पाहिलं जातं. पर्यटकांची पसंती गोवा राज्यालाच असते. गोवा सरकार देखील पर्यटनाला चालना देण्यासाठी, पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी नवनवीन सोयीसुविधा पुरवत आहे. पर्यटन क्षेत्रातील गेम चेंजर म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात मोठ्या थाटामाटात करण्यात आले.विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे 4.4 दशलक्ष प्रवासी अपेक्षित आहेत. विमानतळामुळे राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि पर्यटन उद्योगाच्या गरजा मोठ्या प्रमाणात पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. मोपा हे गोव्याच्या पर्यटनासाठी महत्वाचा घटक ठरणार आहे.

Year End 2022
New Zuari Bridge: झुआरी पुल खुला होताच 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केला पुलावरून प्रवास

पर्यटन वाढीसाठी 'मोपा आणि झुआरी पुलासारख्या प्रमुख प्रकल्पांची पूर्तता, चार्टर पर्यटन पुन्हा सुरू करणे आणि बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई करणे' हे गोवा राज्याने केलेले या वर्षीचे काही प्रमुख उपाय होते. दोन वर्षांच्या कोरोना व्हायरस साथीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी संघर्ष करत असलेल्या पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु नवीन कोविड संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनिश्चिततेची भीतीही आहे.

Year End 2022
Arambol Beach: परप्रांतीय विक्रेत्यांमुळे हरमलची बदनामी कारण...

समुद्रकिनार्‍यावरील शॅक आणि वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर्सच्या बेकायदेशीरतेच्या विरोधातील कारवाई आणि धडक देण्याचा सरकारचा सक्रिय प्रयत्न आणि पर्यटन विभागाकडे नोंदणी न केलेल्या हॉटेलवाल्यांवर कारवाई हे सरकारचे या वर्षातले पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने स्वागतार्ह पाऊल होते. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा यांनी देखील या बाबत आपले मत मांडले, ते म्हणाले सरकारने बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे जे एक चांगले लक्षण आहे. गोव्यातील पर्यटन बहरण्यासाठी हे अतिशय योग्य पाऊल आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com