Arambol Beach: परप्रांतीय विक्रेत्यांमुळे हरमलची बदनामी कारण...

Arambol Beach: परप्रांतीय साहित्य विक्रेते वस्तू घेण्यासाठी पर्यटकांच्या मागे लागतात, त्यामुळे हरमलची बदनामी होत आहे.
Goa Arambol Beach
Goa Arambol BeachDainik Gomantak

Arambol Beach: हरमल येथील किनारी भागात तसेच किनाऱ्यावर परप्रांतीय लोकांनी पर्यटनस्थळांची बदनामी चालविली असून त्यात आईस्क्रिम, चिप्स, माळा, ढोलकी व शेंगदाणे विक्रेत्यांनी मनमानी कारभार चालविल्याने पर्यटक व स्थानिक संतप्त झाले आहेत. त्यांच्या या कृतीमुळे किनारा बदनाम होत आहे. याकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत आहे.

नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झालेली आहे. त्यांना पाहून अनेक परप्रांतीय साहित्य विक्रेते त्यांच्या मागे लागतात. किनाऱ्यावर कित्येक पर्यटक पहुडलेले असतात, त्यामुळे ही लमाणी मंडळी त्यांचा पिच्छा पुरवतात. शेकडोंचा माल हजार रुपयांत विकून पसार होतात.

Goa Arambol Beach
Kala Academy: 'झुरळ' हे नाटक म्हणजे अतिनाट्यात चिरडलेला प्रयोग

कोणीही माल ‘नको’ म्हटल्यास लमाणी व शेंगदाणे विक्रेते वाद घालतात. अलीकडे लमाणी लोकांची लहान मुले चिप्स पॅकेट विकून टेबल व बेड्‌सवर बसलेल्या पर्यटकांना सतावत असल्याच्या तक्रारी शॅक्स व्यावसायिकांनी केल्या आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com