St. Xavier Exposition: पाकिस्तानातून गोव्यात किती भाविक येणार? आकडेवारीत ५० टक्क्यांनी घट, व्हिसा नव्हे तर हे आहे कारण

Saint Francis Xavier Exposition 2024 Pakistani Pilgrims: वर्ष 2014 मध्ये एकूण 400 पाकिस्तानी भाविकांनी सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला भेट दिली होती मात्र यंदाच्यावर्षी हा आकडा थेट 170 वर घसरण्याची शक्यता आहे
Karachi Travelers to Goa Exposition 2024: वर्ष 2014 मध्ये एकूण 400 पाकिस्तानी भाविकांनी सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला भेट दिली होती मात्र यंदाच्यावर्षी हा आकडा थेट 170 वर घसरण्याची शक्यता आहे
St. Francis Xavier Dainik Gomantak
Published on
Updated on

Saint Francis Xavier Exposition 2024 Pakistan Tourist

जुने गोवे : गोंयचो सायब यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याला येत्या 21 तारखेपासून सुरुवात होणार आहे. देश-विदेशातून गोव्यात हजारोंच्या संख्येत लोकं दरम्यान भेट देतील. मात्र, यंदा पाकिस्तानातून येणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला आहे. २०१४ मधील शवप्रदर्शन सोहळ्याला पाकिस्तानातून ४०० भाविक आले होते, यंदा मात्र हा आकडा १७० पर्यंत खाली आला आहे. यामागचं कारण काय आहे हे जाणून घेऊया...

पाकिस्तान- गोवा प्रवासाचा मार्ग काय आहे?

पाकिस्तानमधून येणाऱ्या भाविकांची संख्या घटण्याचे प्रमुख कारण विमानसेवा आहे. सध्या कराचीहून मुंबईला येणारी थेट विमान नाही. त्यामुळे प्रवाशांना दुबई किंवा श्रीलंकामार्गे गोव्यात यावं लागेल. कराची ते मुंबई असा थेट प्रवास केल्यास 1 तास किंवा 45 मिनिटांमध्ये मुंबई गाठता येते.

Karachi Travelers to Goa Exposition 2024: वर्ष 2014 मध्ये एकूण 400 पाकिस्तानी भाविकांनी सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला भेट दिली होती मात्र यंदाच्यावर्षी हा आकडा थेट 170 वर घसरण्याची शक्यता आहे
Saint Francis Xavier Exposition: पाकिस्तानातून शेकडो भाविक गोव्यात येणार, संत झेवियर शवदर्शन सोहळ्याला लावणार हजेरी

मात्र आता ही सोय उपलब्ध नसल्याने येणाऱ्या प्रवाशांना 8 तासांचा लेओवर सहन करावा लागणार आहे. वर्ष 2014 मध्ये प्रवाशांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होती आणि आता मात्र यात बदल झालेला असल्याने भाविकांच्या आकड्यात घट होण्याची शक्यता आहे.

विमानप्रवासाचा खर्च किती?

या विमानप्रवासाचा खर्च 2.5 लाखांच्या घरात जाणारा असल्याने प्रवासी हा प्रवास टाळत आहेत. एखाद्या माध्यमवर्गीय माणसाला कुटुंबासह प्रवास करण्यासाठी हा खर्च परवडणारा नाही, तसेच गोव्यात येताक्षणी त्यांना राहाची आणि इतर व्यवस्था करावी लागणार असल्याने एकूण खर्च परवडण्याजोगा वाटत नसल्याने काही भाविक मागे फिरत आहेत. समजा एकाच कुटुंबातील चार किंवा पाच जणांना यायचे असेल तर हा खर्च आठ ते दहा लाखांच्या घरात पोहोचतो आणि तो सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना झेपणारा नाही.

शवप्रदर्शनाबाबत पाकिस्तानात काही महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती. यात ४०० हून अधिक भाविकांनी प्रदर्शनाला येण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, खर्च पाहता यातल्या बहुसंख्य भाविकांनी माघार घेतली.

Karachi Travelers to Goa Exposition 2024: वर्ष 2014 मध्ये एकूण 400 पाकिस्तानी भाविकांनी सेंट झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला भेट दिली होती मात्र यंदाच्यावर्षी हा आकडा थेट 170 वर घसरण्याची शक्यता आहे
Saint Francis Xavier Exposition 2024: संत फ्रान्सिस झेवियर यांचा शवदर्शन सोहळा लाईव्ह पाहता येईल का?

गोमंतकीय वंशाच्या भाविकांना मातृभूमी भेटीची ओढ

पाकिस्तानमधील यात्रेकरूंनी गोवा आणि दमणच्या आर्कडीओसीसकडून निमंत्रण मागवून घेत त्याला व्हिसासोबत जोडून इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालय अर्ज केला आहे आणि 28 नोव्हेंबर रोजी कराचीहून गोव्याला येण्याची प्रतीक्षा करीत आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील गोमंतकियांचे काही वंशज कराचीमध्ये राहतात आणि म्हणूनच ते बऱ्याच काळानंतर पुन्हा गोव्याला जाण्याची अपेक्षा बाळगून आहेत.

काही भाविकांनी गोव्यात एक ते दीड महिने मुक्कामाचा बेतही आखलाय. पुन्हा कधी भारताचा व्हिसा मिळणार याची शाश्वती नसल्याने आता संधी मिळालीये तर गोव्यात काही दिवस थांबू, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातील भाविकाने टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com